7th Pay Commission : केंद्र शासनाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता.
मात्र, आता यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो.
यानुसार आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता सुधारित करण्यात आला असून आता सदर नोकरदार मंडळीच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ तसेच महागाई भत्ता फरकाची रक्कम प्रत्यक्षात खात्यात केव्हा जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मोदी सरकारने केंद्रीय कॅबिनेट मध्ये घेतला मोठा निर्णय
मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुका पाहता या चालू मार्च महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
7 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA आणि पेन्शनधारकांची महागाई सवलत (DR) ४ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 46 टक्के दराने डी ए आणि डी आर मिळत होता. यात आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार टक्के वाढीस मंजुरी मिळाली आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए एकूण ५० टक्क्यांवर पोहोचला आहे.
ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. अर्थातच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता थकबाकी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
यामुळे महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता थकबाकी याचा लाभ खात्यात कधी जमा होईल, असा प्रश्न सदर नोकरदार मंडळीच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
केव्हा जमा होणार DA अन DA थकबाकी ?
महागाई भत्तामध्ये झालेली वाढ आणि महागाई भत्ता थकबाकी याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनात दिला जाणार आहे. मार्च महिन्याचे वेतन अर्थातच कर्मचाऱ्यांच्या हातात एप्रिल महिन्यात जे वेतन येईल त्या वेतनासोबत महागाई भत्ता थकबाकी आणि महागाई भत्ता वाढ याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकणार आहे.
यावरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे.