अदानी कंपनीचा सोलर पॅनल बसवा, वीजबिलापासून मुक्त व्हा, Adani चा 1 KW चा सोलर पॅनलचा खर्च किती ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Adani Solar Panel : जर तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर अलीकडे वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. यामुळे अनेक जण सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत आहेत.

विशेष बाब म्हणजे केंद्र शासन देखील सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देत आहे. यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना राबवली जात आहे. या अंतर्गत एक किलो वॅट पासून ते दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनलसाठी अनुदान दिले जात आहे.

यामध्ये एक किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी तीस हजार रुपये, दोन किलो वॅटच्या सोलर पॅनलसाठी 60000 रुपये, 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमता असलेल्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांचे अनुदान केंद्र शासनाकडून उपलब्ध होत आहे.

तथापि अनेकांच्या माध्यमातून एक किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आज आपण अदानी कंपनीचे एक किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतील हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अदानी कंपनीचे एक किलो वॅटचे सोलर पॅनल किती वीज तयार करणार ?

Adani कंपनीचे एक किलो वॅटचे सोलर पॅनल अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांचा दैनिक वीज वापर तीन युनिट पासून ते पाच युनिट पर्यंत आहे. अर्थातच जे ग्राहक महिन्याकाठी 90 युनिट पासून ते दीडशे युनिट पर्यंतची वीज वापरत असतील त्यांच्यासाठी एक किलोवॅटचे सोलर पॅनल पुरेसे ठरणार आहे.

यापेक्षा जर अधिकचा वीज वापर असेल तर साहजिकच अधिक क्षमतेचे सोलर पॅनल इंस्टॉल करावे लागणार आहेत. आता आपण अदानी कंपनीचे एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च करावा लागू शकतो हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

Adani 1KW सोलर पॅनल चा खर्च किती?

सोलर पॅनलचे ऑफ ग्रीड सोलर पॅनल तथा ऑन ग्रीड सोलर पॅनल असे दोन प्रकार आपल्या भारतात विशेष लोकप्रिय आहेत. या दोन्ही प्रकारानुसार यांचा खर्च मात्र बदलतो. जर ग्राहकाने ऑफ-ग्रीड सोलर सिस्टीम स्थापित केली तर बॅटरीचा वापर पॉवर बॅकअपसाठी केला जातो, अशा सोलरला जास्त पॉवर कट असलेल्या भागांसाठी योग्य मानले जाते.

म्हणजे जिथे वारंवार लाईट जाते अशा ठिकाणी असे सोलर पॅनल फायदेशीर ठरतात. कारण की लाईट गेल्यानंतर बॅटरीमध्ये स्टोअर करण्यात आलेली वीज वापरली जाऊ शकते. अशा संपूर्ण सौर यंत्रणेची सरासरी किंमत सुमारे 65,000 ते 75,000 रुपये असू शकते.

अर्थातच हे सोलर पॅनल ऑनग्रीड सोलर पॅनल पेक्षा थोडेसे महाग असते. जर समजा ग्राहकाने ऑन-ग्रिड सोलर सिस्टीम बसवली तर अशा सोलर सिस्टीममध्ये बसवलेल्या सोलर पॅनलमधून निर्माण होणारी वीज इलेक्ट्रिक ग्रिडसोबत शेअर केली जाते.

या सोलर सिस्टीममध्ये पॉवर बॅकअप नसते. नेट-मीटरचा वापर सोलर सिस्टीममध्ये वाटून घ्यायची वीज मोजण्यासाठी केला जातो. अशी सोलर सिस्टीम बसवण्याचा एकूण खर्च सुमारे 40,000 ते 50,000 रुपये असू शकतो. 

Leave a Comment