8th Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशभरात आठवा वेतन आयोगाच्या पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. येत्या नवीन वर्षात अर्थात 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत सोबतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत.
म्हणजेच येणारे नवीन वर्ष हे निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेतला जाईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला जाईल अशा चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये जोर धरू लागल्या आहेत.
प्रसार माध्यमांमध्ये 2024 मध्ये नवीन आठवा वेतन आयोगासाठीची समिती स्थापित केली जाईल आणि त्यानंतर दोन वर्षांनी अर्थातच 2026 मध्ये प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू होईल असा दावा केला जात आहे.
अशातच आता केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी आठवा वेतन आयोगाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे की नाही याबाबत केंद्राच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
काय म्हणताय वित्त मंत्रालयाचे सचिव
काल अर्थातच शुक्रवारी केंद्र शासनाने आठवा वेतन आयोगाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
वित्त मंत्रालयाचे सचिव टी वी सोमनाथन यांनी सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी 54 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची केंद्राची कोणतीही योजना नाही.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी सुद्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सध्या सरकारचा कोणताच विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
आता पुन्हा एकदा केंद्र शासनाने हीच भूमिका पुन्हा नव्याने स्पष्ट केली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम लागणार असे चित्र आहे.