काय सांगता ! कुटुंबातील ‘हा’ व्यक्ती कुणाच्याही परवानगीविना विकू शकतो संपूर्ण संपत्ती, सुप्रीम कोर्टाने दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Rights : भारतात संपत्तीबाबत विविध कायदे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे माननीय न्यायालयाच्या माध्यमातून देखील वेळोवेळी संपत्ती बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. अशातच आता सुप्रीम कोर्टाने जॉईंट कुटुंबाच्या संपत्ती बाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिला आहे.

माननीय न्यायालयाने नुकताच अविभाजित हिंदू कुटुंब किंवा संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेबाबत एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाचा निकाल दिला आहे.

यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर त्या कुटुंबातील ‘कर्ता’ इच्छित असेल तर तो संयुक्त मालमत्ता कोणाच्याही परवानगीशिवाय विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो.

म्हणजेच जॉईंट फॅमिली मधील इतर सदस्याला न विचारता सदर कर्ता पुरुष अशी मालमत्ता विकू शकतो किंवा कोणाकडे गहाण ठेवू शकतो.

भागधारक अल्पवयीन असला तरी, कर्ता परवानगी न घेता मालमत्तेबाबत निर्णय घेऊ शकतो, असे न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. कायद्यानुसार, हिंदू कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुष हा कर्ता बनत असतो.

जर ज्येष्ठ पुरुष मरण पावला, तर त्याच्यानंतर जो ज्येष्ठ असेल तो आपोआप कर्ता होत असतो. तथापि, काही प्रकरणांमध्ये ते विल द्वारे म्हणजे इच्छापत्राच्या माध्यमातून देखील घोषित केले जाते.

दरम्यान, माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना कर्ता पुरुषाचे हिंदू संयुक्त कुटुंबातील मालमत्तेवर असलेले अधिकार अधोरेखित केले आहेत. खरे तर एका याचिकाकर्त्याने सुरवातीला मद्रास हाय कोर्टात एक याचिका दाखल केली होती.

यात याचिकाकर्त्याने दावा केला की, त्याच्या वडिलांनी एक मालमत्ता गहाण ठेवली होती जी संयुक्त कुटुंबाची मालमत्ता होती. तथापि, याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की त्याचे वडील कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारे होते.

यावर मद्रास उच्च न्यायालयाने मालमत्तेबाबत कर्ता निर्णय घेऊ शकतो आणि यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही, असा निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाण्यास नकार दिला.

अर्थातच माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील हिंदू संयुक्त कुटुंबातील कर्ता पुरुष हा कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता परीवारातील इतर सदस्यांना न विचारता विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो, हे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment