Ahmednagar Electric Bus : अहमदनगर शहरात शहर बसेवेचा नेहमीच मोठा प्रॉब्लेम राहिलेला आहे. नगरवासियांना शहरात व उपनगरात दळणवळणासाठी कायमस्वरूपी बससेवाच अद्याप मिळालेली नाही. परंतु आता ही समस्या पूर्णपणे सुटणार आहे.

केंद्र सरकारकडून शहरासाठी पहिल्या टप्प्यात ४० इलेक्ट्रिक बस मिळणार असून या महानगरपालिकेच्या मालकीच्या या बस असणार आहेत. केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट खात्यामधून यासाठी निधी उपलब्ध झालाय.

Advertisement

मुंबईतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर नवीन बस असतील. यामुळे आता शहरवासीयांना कमी दरात शहरात अंतर्गत प्रवास करता येईल. करणे सुकर होणार आहे. येत्या महिनाभरात बस सुरू होईल. यामुळे आता आमदार संग्राम जगताप यांनी दिल्लीत केलेल्या पाठपुराव्यास यश मिळणार आहे.

नगर वासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार

Advertisement

नगर शहरात बसचा मुद्दा जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. आजवर ठेकेदाराला बसचा ठेका दिला जायचा. त्यांच्याकडून ठरावीक मार्गावरच बस धावल्या जायच्या. त्यामुळे रिक्षात जास्त प्रवासी वाहतूक व्हायची.

आता हे सर्व प्रश्न शहरात बससेवा सुरु झाल्यास सुटतील. आमदार जगताप यांनी गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीत पाठपुरावा केला व याला यश आले असून पहिल्या टप्प्यात ४० बस व पुढील टप्प्यात आणखी वाढ होईन जास्त बस मिळतील.

Advertisement

केडगावात अडीच एकरांवर बस डेपो

केडगाव येथे बस डेपो उभा राहील. केडगाव येथे साडेपाच एकरांपैकी अडीच एकरांवर बस डेपो असेल. याच ठिकाणी चार्जिंग स्टेशन असेल. शहरातील प्रमुख मार्ग, उपनगरांत या बस धावणार असल्याने उपनगरांतील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी वेगळ्या बसचे नियोजन देखील केले जाण्याचीच शक्यता आहे.

Advertisement

आमदार संग्राम जगताप म्हणाले…

शहरातील अंतर्गत वाहतूक हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून नगरकरांना चांगल्या पद्धतीची बससेवा मिळावी, यासाठी मी दिल्लीत केंद्र सरकारकडे पाठपुरावा माझा सुरु होता. आता यात यश मिळाले असून शहराला लवकरच बससेवा मिळेल. या इलेक्ट्रिक बस असल्याने प्रदूषण देखील होणार नाही असे आ. संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *