8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरेतर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. या वेतन आयोगाची स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि हा वेतन आयोग प्रत्यक्ष 2016 मध्ये कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता.
म्हणजे सातवा वेतन आयोगाची स्थापना आजच्या दहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत मागणी जोर धरू लागली आहे.
केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकांपूर्वीच नवीन वेतन आयोगाची स्थापना केली पाहिजे अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांची आहे.
2024 मध्ये आठवा वेतन आयोगासाठी समितीची स्थापना केली पाहिजे आणि 2026 मध्ये आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
खरे तर पहिला वेतन आयोग 1946 मध्ये तयार झाला आणि यानंतर आतापर्यंत सात वेतन आयोग तयार झाले आहेत.
म्हणजेच आतापर्यंतच्या ट्रेंड नुसार दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाची भेट या ठिकाणी दिली जात आहे.
अशा परिस्थितीत, सातवा वेतन आयोगाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार का ? हा मोठा सवाल उपस्थित होत आहे.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला याबाबतचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारकडे विचाराधीन नाहीये. आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताच विचार मोदी सरकारकडून सुरू नाहीये.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचार करत नसल्याचे सांगितले आहे.
मात्र याचा अर्थ असा होत नाही की आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना लागूचं होणार नाही. आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होऊ शकतो मात्र यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.