बँकेत एफडी करताय ? मग FD करण्यापूर्वी एफचे नुकसान जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD : बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. विशेषतः या गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत व्यक्त करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या दीड वर्षात आरबीआय ने रेपो रेट जवळपास अडीच टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. साहजिकच रेपो रेट वाढली असल्याने एफडी वरील व्याजदर देखील आता वाढले आहेत.

यामुळे एफ डी करणाऱ्यांना चांगला परतावा या ठिकाणी मिळू लागला आहे. अशा परिस्थितीत आता गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदार एफडी कडे वळू लागले आहे. मात्र एफडी करण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. दरम्यान आज आपण एफडी केल्यास काय तोटे होऊ शकतात याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

परतावा खूपच कमी मिळतो : एफडी ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. एफडी मधला पैसा कधीही बोलू शकत नाही. परंतु पैसे बुडत नसले तरी देखील या ठिकाणातून मिळणारा परतावा हा खूपच नाममात्र असतो. एफडी करणाऱ्यांना कमाल साडेआठ टक्क्यांपर्यंतचे व्याजदर मिळते.

मात्र शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मिळणारा परतावा यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. यामुळे ज्या लोकांना परतावा हवा असतो ते लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या रिस्क ठिकाणी देखील गुंतवणूक करतात.

एफ डी तोडल्यास नुकसान होते : ही एक निश्चित कालावधीसाठी केलेली गुंतवणूक असते. जर गुंतवणूकदाराने एफडी वेळे आधीच तोडली तर त्याला मोठा दंड भरावा लागतो. यामुळे अनेक जण एफडी ऐवजी गुंतवणुकीसाठी इतर पर्यायांचा शोध घेतात.

मार्केटमधील तेजीचा फायदा मिळत नाही : शेअर मार्केटमधील आणि एफ डी वरील गुंतवणुकीवर एक मोठा डिफरन्स म्हणजे एफ डी मध्ये गुंतवणूक केल्यास मार्केटच्या तेजीचा फायदा मिळत नाही. परंतु शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर मार्केटचा तेजीचा फायदा मिळतो. एफडी करणाऱ्यांना बँकेने ठरवून दिलेल्या व्याजदराप्रमाणेचं परतावा मिळतो.

एफडीच्या व्याजेवर टॅक्स भरावा लागतो : FD केल्यानंतर जे व्याज मिळते त्यावर टॅक्स भरावा लागतो. मात्र एलआयसी आणि पोस्ट ऑफिस मधील इतर काही योजनांमध्ये टॅक्स भरावा लागत नाही. याचा अर्थ असा नाही की एलआयसी आणि पोस्ट ऑफिस मधल्या सर्वच बचत योजनांवर टॅक्स फ्री लाभ मिळतो. परंतु अशा काही योजना आहेत ज्यामध्ये टॅक्स फ्री लाभ दिला जातो.

महागाईच्या तुलनेत मिळणारे रिटर्न खूपच कमी : गुंतवणूक ही वाढती महागाई नियंत्रणात रहावी यासाठी केली जाते. मात्र एफडी मधून मिळणारा परतावा खूपच कमी असल्याने वाढत्या महागाईवर यामुळे मात करता येत नाही. परिणामी गुंतवणुकीचा फारसा फायदा होत नाही असे जाणकार सांगतात.

चक्रवाढ व्याज लागू होत नाही : एफ डी वरील गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत नाही. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीत मात्र चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. परिणामी अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दाखवतात.

बँक बुडाली तर नुकसान होते : एफ डी मधली गुंतवणूक सुरक्षित असते. मात्र जर बँक बुडाली तर एफडी मधला पैसा वाया जातो. यामुळे एफ डी मध्ये गुंतवणूक करण्याचा हा देखील एक तोटाच आहे असे जाणकार सांगतात. दुसरीकडे सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास मात्र मिळणारा परतावा हा जरी बाजारातील तेजीचा एक भाग राहत असला तरी देखील बँक बुडण्याचा अशा गुंतवणुकीवर परिणाम होत नाही. 

Leave a Comment