8th Pay Commission : देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर समोर आली आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर सध्या स्थितीला आदेश आता आदर्श आचारसंहिता लागू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ही आचारसंहिता लागू झाली आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. निवडणुकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी केंद्र शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
अशातच आता केंद्र कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोगासंदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर जे सरकार सत्तेत येईल ते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी देऊ शकते.
खरे तर आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच आठवा वेतन आयोगाबाबत निर्णय होऊ शकतो असा अंदाज बांधला जात होता. पण, नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने अद्याप चर्चा केलेली नाही.
यामुळे देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचाऱ्यांची मने दुखावली गेली आहेत. मात्र लोकसभा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर जे नवीन सरकार सत्ता स्थापित करेल ते सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते.
हाती आलेल्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगाचा कालावधी आता संपत आहे. सातवा वेतन आयोग 2016 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला तर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो. यानुसार आठवा वेतन आयोग हा 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे.
यामुळे लवकरच नवीन वेतन आयोग स्थापन करण्यात येणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होईल अशी अपडेट समोर आली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, कर्मचारी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अन वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकार आठवा वेतन आयोग लागू करणेबाबत हालचाली वाढवत आहे.
मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होणार, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शिवाय सरकार आठवा वेतन आयोग लागू करेलच याबाबत कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा होत आहे. आतापर्यंत 8 वा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती.
पण, आता सातव्या वेतन आयोगानंतर पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु, कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागण्यांनंतर सरकार पुढील वेतन आयोगाचा विचार करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत आठवा वेतन आयोग लागू करण्याऐवजी सरकार वेतन वाढवण्यासाठी दुसरा फॉर्मुला लागू करणार असे बोलले जात होते. मात्र, मीडिया रिपोर्ट्स मध्ये आता सरकार कोणताच दुसरा फॉर्मुला लागू करणार नाही थेट आठवा वेतन आयोगच लागू करू शकते असे म्हटले जात आहे. यामुळे आता मीडिया रिपोर्ट मध्ये होत असलेला हा दावा खरा ठरणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.