पंजाबरावांचे मोठे भाकीत, म्हणतात की महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पाऊस….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh News : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मान्सून संपल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनोत्तर पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली अन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्यातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची आणि गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली आणि शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके भुई सपाट झाली.

गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामधून जी पीके वाचली होती, ती आता या चालू मार्च महिन्यात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हातातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.

यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात कधी पर्यंत पाऊस बरसणार याबाबत मोठी माहिती दिली आहे.

काय म्हटलेत पंजाबराव ? 

पंजाबरावांनी मागे एक हवामान अंदाज दिला होता. यामध्ये त्यांनी 16 मार्चपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते. यानुसार राज्यात 16 मार्चपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार याबाबत पंजाबरावांनी काय माहिती दिली आहे याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान याच संदर्भात पंजाबरावांनी मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 21 मार्चपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. अर्थातच आज अवकाळी पावसाचा शेवटचा दिवस ठरू शकतो.

पंजाबरावांनी राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली येथे खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अहमदपूर, उदगीर, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा येथेही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

छत्तीसगड अन तेलंगणामध्ये खूप मोठा पाऊस सुरु आहे, हेच कारण आहे की, याचा फटका महाराष्ट्राला बसत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. या राज्यांमध्ये पाऊस सुरू असल्याने पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.

पण, राज्याच्या पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात अधिक पाऊस बरसणार अस त्यांनी स्पष्ट केल आहे. अवकाळी पावसाचे हे सत्र आज संपेल आणि उद्यापासून राज्याचे हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे उद्यापासून राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा वाढणार असही त्यांनी म्हटल आहे.

Leave a Comment