Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
प्रामुख्याने मुंबई ते पुणे असा रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काही वाहनांना प्रवास करण्यास बंदी लावण्यात आली आहे.
खरे तर, उद्या अर्थातच 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणजेच नाताळचा सण साजरा होणार आहे. दरम्यान ख्रिसमसला शासकीय सुट्टी जाहीर झालेली आहे. म्हणजे शनिवारी, रविवारी आणि सोमवारी सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत.
यामुळे वीकेंड चांगलाच मोठा झाला आहे. परिणामी या तीन दिवसांच्या सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी अनेक जण शहरातून बाहेर पडत आहेत. यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. हेच कारण आहे की, या मार्गावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गावर दुपारी 12 पूर्वी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खरे तर सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची या मार्गावर मोठी गर्दी होत आहे. यामुळे पर्यटकांचा प्रवास कोंडी मुक्त व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी ही माहिती दिली आहे.
अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सिंगल यांनी म्हटल्याप्रमाणे, मागील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला असता अवजड वाहने व कार सकाळी सहा ते बारा या कालावधीत एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात या महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे.
यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अवजड वाहन चालक आणि या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे आणि सहकार्य करावे असे आवाहन देखील सिंगल यांनी केले आहे.