बातमी कामाची ! आधार कार्ड वरील नाव, वय, जन्मतारीख, पत्ता किती वेळा बदलले जाऊ शकते ? नियम काय सांगतो ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Details : आधार कार्ड एक अतिशय महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे. याचा वापर जवळपास सर्वच प्रकारच्या शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये केला जातो. आधार कार्डचा वापर शाळेत ऍडमिशन घेणे, सिम कार्ड काढणे, फायनान्स वर वस्तू घेणे, आयटीआय भरणे, स्कॉलरशिप फॉर्म भरणे, पॅन कार्ड साठी अप्लाय करणे, शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, वाहनाचे रजिस्ट्रेशन, बँक अकाउंट ओपनिंग, रेशन कार्ड साठी अर्ज करणे अशा कित्येक कामांसाठी केला जातो.

शिवाय आधार कार्डच्या मदतीने आता बँकेतून पैसे देखील काढता येत आहेत. मात्र या साऱ्या कामांसाठी अपडेटेड आधार कार्ड असणे आवश्यक असते. आधार कार्ड अपडेटेड असेल तर या सर्व कामांसाठी याचा वापर होतो.

अशा परिस्थितीत या महत्त्वाचे डॉक्युमेंटमध्ये नाव, वय, पत्ता किती वेळा बदलले जाऊ शकते असा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.

आधार कार्ड किती वेळा अपडेट केले जाऊ शकते किंवा यातील नाव, वय, जन्मतारीख पत्ता किती वेळा बदलता येऊ शकतो ? याबाबत काय नियम आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय सांगतो आधार कार्ड अपडेट करण्याचा नियम 

आधार कार्डच्या नियमानुसार, आधार कार्ड मध्ये आधार कार्ड धारक व्यक्ती त्याच्या आयुष्यात दोनदा त्याचे नाव सुधारू शकतो. मुलींचे अनेकदा लग्नानंतर नाव बदलले जाते. लग्नानंतर मुलीच्या नावात बदल होतो यामुळे आधार कार्ड अशा वेळी अपडेट करावे लागते. 

आधार कार्ड मध्ये लिंग बदलायचे असल्यास आयुष्यात एकदाच बदलता येते. जेंडर बदल वारंवार होत नाही. चुकून जर जेंडर मध्ये बदल झाला असेल तर एकदा यात बदल करता येतो. 

आधार कार्डमध्ये जन्मतारीख अद्ययावत करण्याची गरज राहत नाही परंतु जर आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकली असेल आणि त्यामुळे तुम्हाला अडचणी येत असतील तर आपण ते दुरुस्त करू शकता. मात्र यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

नाव आणि जन्मतारखेच्या विपरीत, तुमच्या आधार कार्डवर तुमचा पत्ता अपडेट करण्याची कोणतीच मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही कितीही वेळा आधार कार्ड अपडेट करू शकता. तुम्ही तुमचा पत्ता बदलला की नवीन पत्ता आधारमध्ये अपडेट करू शकता. तुम्ही तुमचा पत्ता बदलता तेव्हा तुमचा नवीन पत्ता अपडेट करणे गरजेचे सुद्धा आहे.

Leave a Comment