Aadhar Card News : आधार कार्ड हा भारतीय नागरिकांचा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. देशाच्या 90% हुन अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. भारतात आधार कार्ड विना कोणतेच काम होऊ शकत नाही असे आपण म्हणू शकतो. कोणतेही शासकीय काम असो किंवा निम शासकीय काम असो त्यामध्ये आधार कार्डची आवश्यकता भासत असते. भारतात साध एक सिम कार्ड काढायचं असलं तरी देखील आधार कार्ड लागतं.
याशिवाय मतदान कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड काढण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी अशा नानाविध कामांमध्ये आधार कार्डचा उपयोग होत असतो.
याशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार आवश्यक असते. कोणतीही शासनाची योजना असो मग ती पीएम किसान योजना असो, पीएम किसान मानधन योजना असो, अटल पेन्शन योजना असो या अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
आधार कार्डचा उपयोग करून पैसे देखील काढता येतात. यावरून आधार कार्डचे महत्व अधोरेखित होते. मात्र या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. आता अनेकांना आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे याची माहिती नसते.
अशा परिस्थितीत आज आपण आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे ? हे कसे चेक करायचे याविषयी सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कसे पाहणार?
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. थोडं खाली गेल्यास तुम्हाला आधार सेवांचा विभाग दिसेल. त्या विभागात तुम्हाला व्हेरिफाय ईमेल आणि मोबाईल नंबरचा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. जिथे तुम्हाला तुमचा लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीचा पर्याय दिसेल. यानंतर तुम्हाला ‘व्हेरिफाय मोबाईल नंबर’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर आणि 10 अंकी मोबाइल नंबर टाकावा लागेल जो तुम्हाला लिंक आहे असे वाटते. यानंतर तुम्हाला कॅप्चा भरून सबमिट करावा लागेल. जर तो नंबर लिंक असेल तर तो तुम्हाला दिसेल.
जर नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तसे सांगितले जाईल. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्याकडे जेवढे मोबाईल नंबर आहेत. ते येथे वापरून नेमका कोणता मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे हे तपासू शकता.