….. तर आधार कार्ड धारकांना ‘या’ कामासाठी भरावे लागणार पैसे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर भारतात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे शासकीय दस्तऐवज आहे. आधार कार्ड विना भारतात साधं एक सिम कार्ड देखील खरेदी केले जाऊ शकत नाही. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते.

वित्तीय कामगाजासाठी देखील आधार कार्ड आवश्यक आहे. बँकेत खाते खोलण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, एडमिशन घेण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, मतदान कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव ॲड करण्यासाठी, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, कर्ज काढण्यासाठी अशा विविध कामांमध्ये आधार कार्डचा उपयोग होतो.

दरम्यान याच महत्त्वाच्या कागदपत्रा संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधार कार्ड हे यु आय डी आय च्या माध्यमातून जारी केले जात असते. दरम्यान याच UIDAI ने 10 वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असल्याची माहिती दिली आहे.

आधार कार्डवर नाव, पत्ता, जन्मतारीख सर्व काही योग्य आणि खरं असणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे महत्त्वपूर्ण काम अडू शकते. अशा परिस्थितीत जर तुमचेही आधार कार्ड काढून दहा वर्षे झाले असतील तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. विशेष म्हणजे आधार कार्ड तुम्हाला 14 जूनपर्यंत विनाशुल्क अपडेट करता येणार आहे.

मात्र 14 जून नंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील. यामुळे जर तुमच्या आधार कार्डलाही दहा वर्षे झाले असतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आवश्यक राहणार आहे. जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही गडबड असेल किंवा नावात बदल करायचा असेल तर आता घर बसल्या ही चुक दुरुस्त करु शकता.

घर बसल्याच नाव, पत्ता, जन्मतारीख बदलू शकता. जर तुम्ही 14 जूनच्या आधी तुमचे आधार कार्ड अपडेट केलेत तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही. मात्र या तारखेनंतर कोणतेही बदल केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान आता आपण आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस पाहणार आहोत.

घरबसल्या आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा

वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसत असलेल्या रकान्यात तुमचा आधार क्रमांकाशी लिंक असलेला फोन नंबर टाकाला लागणार आहे. 

आधार सोबत नोंदणीकृत फोन नंबर एंटर केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल.

आता मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात टाकावा लागणार आहे.

यानंतर तुमच्या स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डवर जे अपडेट करायचे आहे त्यावर क्लिक करावे लागेल.

हवी असलेली माहिती तिथे भरा आणि सबमिट बटण एकदा प्रेस करावे लागणार आहे. एवढे केले की, त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.

Leave a Comment