Aadhar Card News : आधार कार्ड भारतीयांचे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. हे शासकीय डॉक्युमेंट विविध शासकीय कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, निमशासकीय कामांसाठी, सिम कार्ड घेण्यासाठी, बँकेत खाते खोलण्यासाठी, आयटीआर भरण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी अशा एक ना अनेक कामांसाठी आधार कार्डचा वापर होतो.
याशिवाय रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच पॅन कार्ड काढण्यासाठी देखील याचा वापर होतो. मात्र, अनेकांच्या आधार कार्डमध्ये काही चुका देखील झालेल्या आहेत. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते.
यात बायोग्राफिक और डेमोग्राफिक माहिती असते. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि बायोमेट्रिक तपशील समाविष्ट आहेत. मात्र अनेकांच्या आधार कार्डमध्ये त्यांची जन्मतारीख चुकीची आहे.
जन्मतारीख चुकली आहे पण ती आता चेंज कशी करायची हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. दरम्यान आज आपण जर आधार कार्डमधील जन्मतारीख चुकली असेल तर ती चेंज कशी करायची यासाठी काय प्रोसेस असते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Aadhar Card मधील जन्मतारीख फक्त एकदाच चेंज होते
जर तुमच्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकीची छापली असेल तर तुम्ही आधार कार्ड मधील जन्मतारीख बदलू शकता. पण UIDAI च्या नियमांनुसार, तुम्ही आधार कार्डमध्ये जन्मतारीख फक्त एकदाच दुरुस्त करू शकता.
कशी बदलणार जन्मतारीख
आधार कार्डमधील जन्मतारीख चेंज करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागणार आहे. आधार नोंदणी केंद्रावर भेट देऊन तुम्ही आधारमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करून घेऊ शकता. येथे तुम्ही आधार कार्ड मधील चुकीची जन्मतारीख देखील बदलू शकता.
येथे गेल्यानंतर तुम्हाला सुधारणा फॉर्म भरावा लागेल.
यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, आधार क्रमांक आणि तुम्हाला दुरुस्त करायची असलेली माहिती द्यावी लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला जन्मतारीख बदलायची असेल तर तपशील भरा आणि फॉर्म सबमिट करा.
आता आधार केंद्रावर उपस्थित अधिकारी तुमचा बायोमेट्रिक तपशील घेतील आणि त्यांची पडताळणी करतील, ज्यामध्ये तुमच्या फिंगर प्रिंटपासून ते डोळे स्कॅन करण्यापर्यंत सर्व काही समाविष्ट असेल.
यासह तुमचा फॉर्म तपासला जाईल आणि तुमच्याकडून माहितीची पुष्टी केली जाईल.
यानंतर, तुमची कागदपत्रे बरोबर आढळल्यास, तुमची जन्मतारीख अपडेट केली जाते.
आधारमध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल.
काही दिवसांतच आधार कार्डमध्ये नवीन जन्मतारीख अपडेट होईल.
तुम्हाला आधार केंद्रावर URN स्लिप दिली जाते. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आधार अपडेट विनंतीची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकता.
यानंतर, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही UIDAI साइटवर जाऊन अपडेटेड आधार डाउनलोड करू शकता.
कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
तुम्ही पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक, विद्यापीठाने जारी केलेले प्रमाणपत्र यासारखे कोणतेही दस्तऐवज सादर करून आधार कार्ड मधील जन्मतारीख बदलू शकता.