……तर आधार कार्ड धारकाला 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार ! ‘हे’ नियम तुम्हाला माहीतचं असायला हवेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card News : प्रत्येक भारतीय नागरिकाकडे तुम्हाला आधार कार्ड पाहायला मिळणार आहे. आधार कार्ड हे भारतीयांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडेही आधार कार्ड असेलच नाही का ? खरेतर, हा ओळखीचा पुरावा जवळपास सर्वच कामांमध्ये उपयोगी ठरतो. शासकीय, निमशासकीय कामांमध्ये आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, सिम कार्ड काढण्यासाठी शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी वोटिंग कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड काढण्यासाठी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी अशा नानाविध ठिकाणी आधार कार्डचा वापर अनिवार्य आहे.

याशिवाय बँकेला आधार कार्ड लिंक असते. मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असते. पॅन कार्ड, वोटिंग आयडी कार्ड, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांना आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असते. यावरून आपल्याला आधार कार्ड हे किती महत्त्वाचे दस्तऐवज आहे हे लक्षात येते.

आधार शिवाय कोणतेही सरकारी किंवा खाजगी काम करणे अवघड आहे. असं म्हणण्यापेक्षा आधार कार्ड नसेल तर बहुतांशी कामे होऊच शकत नाहीत. मग ते सरकारी योजनांचा किंवा अनुदानाचा लाभ घेणे असो किंवा तुमच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देणे असो. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारमध्ये असलेले तपशील बरोबर असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

जर तुमच्या आधार कार्डमधील माहिती चुकीची असेल तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार बनवताना चुकीची डेमोग्राफिक किंवा बायोमेट्रिक देणे हा गुन्हा आहे.

जर समजा तुम्ही आधारमध्ये चुकीचे नाव, जन्मतारीख आणि लिंग लिहिले असेल तर तुम्हाला 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय 10,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारमध्ये यापैकी कोणताही तपशील चुकीचा असल्यास, तो त्वरित अपडेट करा.

नाहीतर तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. एकंदरीत आधार कार्ड मध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

किंवा मग दहा हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास अशी दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते. यामुळे, आधार कार्ड मध्ये चुकीची माहिती देऊ नये. जर समजा तुमच्या आधार कार्ड मध्ये माहिती चुकलेली असेल तर तुम्ही ती माहिती अपडेट केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला दंड अथवा तुरुंग वास भोगावा लागणार नाही.

Leave a Comment