Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. हा ओळखीचा पुरावा प्रत्येकच ठिकाणी कामी येतो. भारतात साधे एक एक सिम कार्ड जरी काढायचे असले तरी देखील आधार कार्ड द्यावे लागते.
आधार कार्डची उपयोगिता यावरून स्पष्ट होते. अशा परिस्थितीत जर एखाद्याचे आधार कार्ड हरवले तर त्याला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये आधार कार्ड एक महत्त्वाचा पुरावा आहे.
यामुळे जर आधार कार्ड हरवले तर याचा नागरिकांना फटका सहन करावा लागू शकतो. हे सर्वसामान्यांच्या गैरसोयीचे आणि चिंतेचे एक मोठे कारण बनू शकते.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेल्या आधार कार्डमध्ये अनेक सरकारी आणि आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती असते.
अशा परिस्थितीत, आधार कार्ड हरवले तर ताबडतोब डुप्लिकेट आधार कार्ड तयार करावे लागणार आहे. दरम्यान, आता आपण आधार कार्ड हरवल्यानंतर नवीन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करता येऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड हरवले तर डाउनलोड कसे करायचे ?
UIDAI कडून डुप्लिकेट आधार कार्ड मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे. आता नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने डुप्लिकेट आधार कार्ड मिळू शकते.
जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे डुप्लिकेट आधार ऑनलाइन सहजपणे घेऊ शकता.
डुप्लिकेट आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रोसेस
तुमच आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही डुप्लिकेट आधार कार्ड साठी अर्ज करू शकता. जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी नोंदणीकृत असेल तर तुम्ही तो UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन डुप्लिकेट आधारसाठी अर्ज करू शकता.
https://myaadhaar.uidai.gov.in/portal या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी एंटर करायचा आहे आणि OTP सह पडताळणी करायची आहे. तसेच PDF डाउनलोड करायची आहे. तुम्ही प्रिंटआउट घेऊन ते लॅमिनेट करू शकता.