पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल ! पुणे-नगर महामार्गासह ‘या’ महत्त्वाच्या रस्त्यांच्या वाहतुकीत झाला बदल, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की पुणे शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल सारख्या विविध विकासकामांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

एकीकडे शहरात ही विकास कामे सुरू आहेत आणि दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. याचा परिणाम म्हणून शहरात वाहतूक कोंडी होत असून अपघात होण्याची भीती आहे.

यामुळे नागरिकांना धोका निर्माण होत आहे. शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

दरम्यान शहरातील नागरिकांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पुणे-नगर महामार्ग, वाघोली वाघेश्वर चौक ते खराडी बायपास, वाघोली ते शिवाजी चौक केसनंद गांव, लोहगांव वाघोली रोड, वाघोली लोहगांव चौक ते लोहगांव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी, वाघेश्वर चौक, वाघोली ते लोणीकंद, लोहगाव ते पेट्रोलसाठा चौक ते विश्रांतवाडी या रस्त्यांवर आता सकाळी 7 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

या रस्त्यावर या कालावधीमध्ये जड, अवजड व मंद जसे की डंपर, आर. एम. सी. मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर व इतर तत्सम वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तथापि अत्यावश्यक वाहनांना या रस्त्यावरून वाहतुकीस आधीप्रमाणेच परवानगी राहणार आहे.

पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त श्रीकांत बोराटे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. मात्र हा आदेश प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांकडून 5 मार्चपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत.

दरम्यान या आदेशावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर उपायुक्त याबाबतचा अंतिम आदेश जारी करणार अशी बातमी समोर आली आहे. निश्चितच या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घातली असल्याने इतर सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार अशी आशा आहे.

Leave a Comment