Aadhar Card Rules : आधार कार्ड हा भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. हे एक महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. आधार कार्ड विना भारतात कोणतेच काम होऊ शकत नाही. आपल्या देशात साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असेल तरी देखील आधार कार्ड लागते. आधार कार्ड मध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फिंगरप्रिंट अशा विविध गोष्टी नमूद असतात.
विशेष म्हणजे आधार कार्ड हे दुसऱ्या डॉक्युमेंट सोबत देखील लिंक असते. आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक असते. रेशन कार्ड वोटर आयडी कार्ड सोबत देखील आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले गेले आहे. एवढेच नाही तर बँक अकाउंट सोबत देखील आधार लिंक असते. त्यामुळे आधार कार्डचा गैरवापर होण्याची देखील भीती असते.
आधार कार्डचा वापर बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी, वोटर आयडी कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, गॅस कनेक्शन घेण्यासाठी अशा अनेक कामांमध्ये केला जातो.
मात्र जेव्हा एखाद्या आधार कार्ड धारकाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आधार कार्ड चे काय होते याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही मग आज आपण आधार कार्ड धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आधारचे काय होते, याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
मयत व्यक्तीच्या आधार कार्डचे काय होते
UIDAI भारतीय नागरिकांना आधार कार्ड देते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांनाच आधार कार्ड मिळते. मात्र, आधार कार्ड रद्द करण्याची किंवा मयत झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड सरेंडर करण्याची कोणतीच सुविधा सुरू नाहीये.
त्यामुळे मयत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्ड सरेंडर अथवा ते रद्द करता येत नाही. पण ते लॉक करता येते. लॉक केल्यानंतर दुसरी व्यक्ती आधार कार्डचा डेटा एक्सेस करु शकत नाही.
आधार कार्ड लॉक करण्यासाठी uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर My Aadhaar Services या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर मग Lock/Unlock Biometrics हा पर्याय निवडायचा आहे.
या नंतर एक नवीन पेज उघडणार आहे. या नवीन पेजवर तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. मग कॅप्चा कोड टाकायचा आहे. आता Send OTP यावर क्लिक करायचे आहे.
ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डेटाला लॉक/ अनलॉक करण्याचा पर्याय दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला बायोमेट्रिक डेटा लॉक करण्याचा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. अशा तऱ्हेने आधार कार्ड लॉक केले जाऊ शकते.