Aadhar Card Update : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे कागदपत्र भारतीय नागरिकांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. भारतात आधार कार्डचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. शासकीय, निमशासकीय कामांसाठी याचा वापर प्रामुख्याने केला जातो.
भारतात साधे एक सिम कार्ड जरी काढायची असले तरी देखील आधार कार्ड लागते यावरून आपल्याला आधार कार्डची उपयोगिता लक्षात आलीच असेल. मात्र, अनेकदा हे महत्त्वाचे कागदपत्र हरवते. आधार कार्ड हरवल्याने अनेक शासकीय कामांमध्ये नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो.
मात्र आता जर तुमचे आधार कार्ड हरवले तर चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण की, आता आधार कार्ड हरवले तर घरबसल्या आधार कार्ड मागवता येणार आहे. विशेष बाब अशी की, हे नवीन आधार कार्ड एटीएम कार्ड सारखे पीव्हीसीचे राहणार आहे. त्यामुळे हे आधार कार्ड लवकर खराब होत नाही.
विशेष म्हणजे हे आधार कार्ड सोबत बाळगणे देखील खूपच सोपे असते. यासाठी मात्र नागरिकांना 50 रुपयांचे शुल्क भरावे लागते. म्हणजे जर तुमचेही आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही आता फक्त 50 रुपयात नवीन पीव्हीसीचे आधार कार्ड घरबसल्या मागवू शकणार आहात.
कसे मागवणार पीव्हीसीचे आधार कार्ड?
पीव्हीसीचे आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नवीन पीव्हीसी आधार कार्ड मागवू शकता.
यासाठी तुम्हाला वर दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे पीव्हीसी कार्ड वर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी Virtual ID क्रमांक नोंदवावा लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला सेक्युरिटी कोड म्हणजेच कॅपचा कोड टाकावा लागणार आहे. यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या म्हणजे रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो OTP तुम्हाला दिलेल्या रकान्यात टाकायचा आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर पीव्हीसी आधार कार्डचा फोटो दिसेल.
शेवटी मग तुम्हाला ऑनलाइन पन्नास रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचे पीव्हीसी आधार कार्ड तयार केले जाते. मग हे आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते.