कोकणात फिरायला जाताय ? मग ‘या’ ठिकाणाला आवश्य भेट द्या, स्वर्गासारखा अनुभव घेता येईल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Konkan Tourist Destination : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होत चालली आहे. काल-परवा महाराष्ट्रातील काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पण राज्यातील बहुतांशी भागात ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

उन्हाचे चटके नागरिकांसाठी मोठे तापदायक ठरत आहेत. विशेष म्हणजे आगामी काही दिवस असेच हवामान राहू शकते असे मत व्यक्त होत आहे. यामुळे ऑक्टोबर हीटमुळे परेशान झालेली जनता आता फिरण्याचा प्लॅन बनवत आहे. अनेक लोक या वीकेंडला देखील फिरण्यासाठी बाहेर पडणार आहे.

जर तुमचाही या वीकेंडला कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन झाला असेल तर ही बातमी वाचूनच जा. कारण की आज आम्ही कोकणातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती देणार आहोत. जर तुम्हीही या वीकेंडला कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर या ठिकाणाला भेट देऊन तुमची ट्रिप एन्जॉय करू शकणार आहात.

कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ

गणपतीपुळे : हे कोकणातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावतात. जर तुम्ही कोकण एक्सप्लोर करण्याचा प्लॅन बनवत असाल तर गणपतीपुळे टाळून चालणार नाही. अरबी समुद्राच्या कडेला हे ठिकाण वसलेले आहे. इथं तुम्हाला डोंगरमाथ्यावरील खारफुटी, नारळाचे मळे आणि स्वयंभू गणपती मंदिर पाहायला मिळणार आहे. हे एक आकर्षक किनारपट्टीचे शहर आहे. येथे तुम्हाला अनेक विस्मयकारक दृश्ये पाहायला मिळतील जें की तुमच्या ट्रीपला मनोरंजक बनवण्यासाठी पुरेसे ठरेल.

अलिबाग : हे ठिकाण कोकणाची सुंदरता दाखवण्यासाठी पुरेसे आहे. खरंतर कोकणात शेकडो अशी ठिकाणे आहेत जी एक्सप्लोर केली गेली पाहिजेत. पण सर्वच ठिकाणाला तुम्हाला जाणे शक्य होणार नाही पण तुम्ही एकदा अलिबागला नक्कीच भेट दिली पाहिजे. येथील समुद्रकिनारे, किल्ले आणि मंदिरे खूपच प्रसिद्ध आहेत. अलिबाग बीच व्यतिरिक्त येथील किहीम, मुरुड आणि काशीद बीच देखील तुम्ही एक्सप्लोर करू शकणार आहात.

रत्नागिरी : हे कोकणातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर अल्फोन्सो आंबा, समुद्रकिनारे आणि किल्ल्यांसाठी खूपच प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही रत्नागिरी बीच, गुहागर आणि गणपतीपुळे बीच पाहू शकता.

आंबोली : कोकणातील आंबोली धबधबा सौंदर्याचा एक अभूतपूर्व खजाना आहे. येथे तुम्हाला हिरव्यागार टेकड्या आणि वन्यजीवांचे मनमुराद दर्शन घेता येणार आहे. खरंतर आंबोली हे ठिकाण धबधब्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पण धबधब्यासोबतच हे एक प्रमुख हिल स्टेशन देखील आहे. येथे जाऊन तुम्ही हिरण्य केशी आणि महादेवगड धबधबे देखील एक्सप्लोर करू शकता.

Leave a Comment