तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील फोटो आवडत नाही का ? मग Aadhar चा फोटो बदलण्याची सविस्तर प्रोसेस पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Update : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन कागदपत्रे भारतीय नागरिकांकडे असणे आवश्यक आहे. या दोन कागदपत्रांविना भारतात कोणतेच काम केले जाऊ शकत नाही. आपल्या देशात साधे एक सिम कार्ड काढायचे असले तरी देखील आधार कार्ड लागते.

याशिवाय आधार कार्डचा वापर शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, आयटीआर भरण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड मध्ये नाव ॲड करण्यासाठी, रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी, पीएम किसान योजना, पीएम किसान मानधन योजना, नमो शेतकरी योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना अशा शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्डचा उपयोग केला जातो.

आधार कार्ड विना कोणतेच शासकीय अथवा निम शासकीय काम होऊ शकत नाही. पण, अनेकांना त्यांच्या आधार कार्ड वरील फोटो आवडत नाही ही वास्तविकता आहे. यामुळे अनेक लोकांनी आधार कार्ड मधील फोटो कसा बदलला जाऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Aadhar वरील फोटो बदलण्याची प्रोसेस 

तुम्हालाही तुमच्या आधार कार्डचा फोटो बदलायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावे लागणार आहे. आधार कार्ड संबंधित सर्व प्रकारची कामे आधार सेवा केंद्रावर केली जातात. येथे जाऊन तुम्ही तुमच्या आधारवरील फोटो देखील बदलू शकता.

यासाठी मात्र तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागणार आहेत. दरम्यान आधार सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला दुरुस्ती फॉर्म भरावा लागणार आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला आधार क्रमांक, नाव आणि काय दुरुस्ती करायची आहे याबाबत माहिती भरावी लागणार आहे.

यानंतर तुम्हाला हा फॉर्म आधार केंद्रावर उपस्थित असलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल. त्यानंतर संबंधित अधिकारी पुढील प्रक्रिया करतो, ज्यामध्ये तुमचा नंबर अपडेट होतो. यासाठी, प्रथम तुमचे बायोमेट्रिक्स घेतले जातात आणि नंतर तुमचा नवीनतम फोटो क्लिक केला जातो.

फोटोनंतर, तुम्हाला एक स्लिप दिली जाते, जी तुम्हाला सुरक्षितपणे ठेवावी लागेल. या स्लिपद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट केलेल्या फोटोची स्थिती तपासू शकता. आधार कार्ड मधील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये एवढे शुल्क शासनाला द्यावे लागते. 

Leave a Comment