Aadhar Card Update : आधार कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. याचा वापर सर्वच शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी केला जातो. आपल्या देशात साधे एक सिम कार्ड काढायचे असले तरी देखील आधार कार्ड लागते.
याशिवाय आधार कार्डचा उपयोग शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेकडून कर्ज काढण्यासाठी अशा विविध कामांसाठी होतो.
मात्र या सर्व कामांसाठी आधार कार्ड हे अपडेटेड असावे लागते. अनेकांच्या आधार कार्डवर मात्र जन्मतारीख चुकीची नमूद असते. त्यामुळे अशा नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून आधार कार्ड मध्ये जन्मतारीख किती वेळा बदलता येते ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आता आपण आधार कार्ड मध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग किती वेळा बदलले जाऊ शकते, याविषयी काय नियम आहेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आधार कार्डमधील जन्मतारीख किती वेळा बदलता येते
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधार कार्ड मधील जन्मतारीख ही एकदा बदलता येऊ शकते. यामुळे जर तुमच्या आधार कार्ड मधील जन्मतारीख चुकली असेल तर तुम्ही ती जन्मतारीख बदलू शकता.
मात्र तुम्हाला जन्मतारीख केवळ एकदाच बदलून मिळणार आहे. त्यामुळे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आधार कार्डमधील लिंग (Gender) देखील बदलता येते मात्र यातील लिंग एकदाच बदलता येते.
आधार कार्डमधील नाव जर चुकीचे असेल तसेच जर लग्नानंतर नवविवाहितेला आपले आधार कार्ड वरील नाव चेंज करायचे असेल तर नाव अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
यातील नाव दोनदा अपडेट करता करते. आधार कार्डमधील पत्ता देखील बदलता येतो, यातील पत्ता हा कितीही वेळा बदलला जाऊ शकतो. जर तुम्ही कुठे नवीन ठिकाणी कामानिमित्त शिक्षणानिमित्त स्थायिक झालात तर तुम्हाला आधार कार्ड मधील पत्ता अपडेट करता येणार आहे. यासाठी आधार सेंटरवर जावे लागते.
आधार कार्ड मधील पत्ता, नाव, लिंग, जन्मतारीख इत्यादी अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये लागतात. दुसरीकडे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी म्हणजेच फिंगरप्रिंट, आयरीस आणि फोटो अपडेट करण्यासाठी शंभर रुपये लागतात.
जन्मतारीख अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
0-18 वर्षे वयोगटातील लोकांची जन्मतारीख केवळ जन्म प्रमाणपत्राद्वारे अपडेट केली जाऊ शकते. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक पासपोर्ट, मार्कशीट, पेन्शनधारकाचा पीपीओ, जन्म प्रमाणपत्र यावरून त्यांची जन्मतारीख अपडेट करू शकतात.