SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 10 लाख रुपयांचे एज्युकेशन लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Education Loan Details : तुम्हीही एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात का? हो मग तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. विशेषतः ही बातमी एसबीआय कडून एज्युकेशन लोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआय बँकेच्या एज्युकेशन लोन विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय ही पब्लिक सेक्टरमधील अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते. एज्युकेशन लोन, गोल्ड लोन, पर्सनल लोन, होम लोन, बिझनेस लोन अशा विविध प्रकारचे कर्ज बँकेकडून दिले जाते.

विशेष म्हणजे एसबीआय खूपच कमी इंटरेस्ट रेट मध्ये आपल्या ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. एसबीआय च्या माध्यमातून कमी इंटरेस्ट रेटमध्ये एज्युकेशन लोन देखील उपलब्ध करून दिले जात आहे. पण आज आपण एसबीआयच्या एज्युकेशन लोनची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआयचे एज्युकेशन लोन

देशातील विविध बँका एज्युकेशन लोन उपलब्ध करून देतात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा एज्युकेशन लोनचा मोटो असतो. आर्थिक कारणांमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी बँकांकडून त्यांना शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

याला शैक्षणिक कर्ज म्हणून ओळखले जाते. या कर्जासाठी बँकांच्या माध्यमातून कमीत-कमी व्याज आकारण्याचा प्रयत्न होतो. एसबीआय बँक बाबत बोलायचं झालं तर एसबीआय आपल्या ग्राहकांना स्टुडन्ट लोन स्कीम अंतर्गत एज्युकेशन लोन पुरवत आहे.

यासाठी एसबीआय 11.15% एवढे व्याजदर आकारते. मात्र हे व्याजदर फ्लोटिंग आहेत. विशेष बाब अशी की विद्यार्थिनींना या व्याजदरात 0.50% सूट दिली जाते.

10 लाखाचे एज्युकेशन लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ?

समजा तुम्ही एसबीआय बँकेकडून दहा लाख रुपयांचे एज्युकेशन लोन 5 वर्ष कालावधीसाठी घेतले, यासाठी एसबीआयने तुम्हाला 11.15% एवढे व्याजदर लावले तर तुम्हाला 21,817 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

या कालावधीत तुम्हाला तीन लाख 9 हजार वीस रुपये व्याज म्हणून अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण तुम्हाला 13 लाख 9 हजार 20 रुपये भरावे लागणार आहेत.

जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला एसबीआयकडून दहा वर्षे कालावधीसाठी दहा लाख रुपये एज्युकेशन लोन मंजूर झाले आणि या कर्जासाठी 11.15% एवढे व्याजदर लावले गेले तर सदर विद्यार्थ्याला 13,860 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे.

या कालावधीत त्या विद्यार्थ्याला सहा लाख 63 हजार दोनशे रुपये अतिरिक्त व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. अर्थातच व्याज आणि मूळ रक्कम असे एकूण 16 लाख 63 हजार दोनशे रुपये सदर विद्यार्थ्याला बँकेला परत करावे लागणार आहेत.

Leave a Comment