Aadhar Card : तुमचे आधार कार्ड हरवल्यास तुम्ही काय करणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. हा ओळखीचा पुरावा भारतीयांसाठी खूपच गरजेचा आहे. हे एकमात्र असे डॉक्युमेंट आहे जे की प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना साध एक सिम कार्ड जरी काढायचं असलं तरीदेखील आधार कार्डची गरज भासते.

याशिवाय आधार कार्डचा उपयोग पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बँक अकाउंट ओपनिंग, स्कॉलरशिप फॉर्म भरणे, शाळेत ऍडमिशन घेणे, केवायसी करणे, शासकीय योजनेचा लाभ घेणे अशा विविध ठिकाणी केला जात आहे.

आधार कार्ड विना भारतात कोणतेच शासकीय तथा निमशासकीय काम होऊ शकत नाही. जर तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि तुम्हाला हॉटेलमध्ये रूम बुक करायचे असेल तरीदेखील तुमच्याकडून आधार कार्ड मागितले जाणार आहे.

यावरून आपल्याला हे डॉक्युमेंट किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येते. मात्र जर तुमचे आधार कार्ड हरवले तर तुम्ही काय करणार? आपल्या जवळील हे महत्त्वाचे कागदपत्र हरवले तर आपण नक्कीच अडचणीत सापडणार आहात.

यामुळे आधार कार्ड हरवल्यानंतर नवीन आधार कार्ड कसे बनवायचे हा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच संदर्भात अगदी सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आधार कार्ड हरवल्यास नवीन आधार कार्ड कसे मागवायचे?

जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा खराब झाले तर तुमच्याकडे एक पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही आधार कार्डची सॉफ्ट कॉपी मोफत मिळवू शकता. याची सॉफ्ट कॉपी मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.

तुम्हाला माय आधार पोर्टल या वेबसाईटवर विविध सुविधा उपलब्ध होणार आहे. जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल आणि तुम्हाला या कार्डची सॉफ्ट कॉपी हवी असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर गेल्यानंतर डाऊनलोड आधार या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.

येथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर किंवा एनरोलमेंट क्रमांक टाकावा लागणार आहे. हा क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करायचा आहे.

ओटीपी वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ई-आधार डाऊनलोड करू शकणार आहात. येथे तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईल मिळणार आहे. जर तुम्हाला फिजिकल कॉपी पाहिजे असेल म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड घरी मागवायचे असेल तर याच प्रोसेसने तुम्ही आधार कार्ड ऑर्डर करू शकता.

तुम्ही पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकता यासाठी तुम्हाला पन्नास रुपये फी द्यावी लागणार आहे. पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर केल्यानंतर हे आधार कार्ड पोस्टातून तुमच्या घरी पाठवले जाणार आहे.

Leave a Comment