Aadhar-Pan Link Process : देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागणार आहे. खरे तर आधार आणि पॅन हे दोन्ही डॉक्युमेंट भारतीय नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकांकडे हे दोन्ही कागदपत्र असणे आवश्यक आहे.
विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि शासकीय कामांसाठी या दोन्ही कागदपत्रांचा वापर होत असतो. दरम्यान, हे दोन्ही कागदपत्र केंद्रातील सरकारने लिंक करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. पॅन-आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाने ३१ मे २०२४ पर्यंत वेळ दिला आहे. जर तुम्ही अजून पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे लागणार आहे.
दरम्यान, आता आपण आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे कसे चेक करायचे या विषयी माहिती पाहणार आहोत. खरे तर अनेकांना त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही याची माहिती नसते.
यामुळे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे कसे चेक करावे अशी विचारणा सातत्याने केली जात आहे. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
आधार पॅन लिंक आहे की नाही? हे कसे चेक करणार
तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या एसएमएसवर जाऊन UIDPAN टाइप करावे लागेल. UIDPAN नंतर, तुम्हाला जागा देऊन 12 अंकी आधार क्रमांक आणि 10 अंकी पॅन क्रमांक लिहावा लागेल.
तुम्हाला हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवायचा आहे. मग तुम्हाला पॅन-आधार लिंक पुष्टीकरणाचा संदेश मिळणार आहे.
आधार अन पॅन लिंक करण्याची प्रोसेस
जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने आधार आणि पॅन कार्ड लिंक करायचे असेल तर यासाठी तुम्हाला एक एसएमएस करावा लागणार आहे. UIDPAN स्पेस आधार क्रमांक टाईप करावा लागेल त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरमध्ये स्पेस पॅन क्रमांक टाकावा लागेल.
आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवावा लागणार आहे. यानंतर मग तुम्हाला मॅसेज येईल. यात पॅन-आधार लिंक पुष्टीकरणाचा संदेश मिळणार आहे.