Agriculture News : नमस्कार मित्रांनो ! जर तुम्ही शेतकरी असाल तेव्हा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या नानाभित अशा योजना राबवल्या जात आहेत.
या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांना एकाच छताखाली सर्व योजनेचा लाभ मिळावा, योजनेसाठी वारंवार अर्ज करावा लागू नये यासाठी शासनाने महाडीबीटी फार्मर पोर्टल सुरू केले आहे. हे महाडीबीटी फार्मर पोर्टल शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 100 शासकीय योजनेसाठी अर्ज करता येतो. अशा परिस्थितीत आज आपण या फार्मर पोर्टलवर कशा पद्धतीने नोंदणी करायची, याची प्रोसेस काय आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार?
महाडीबीटी पोर्टल वरून राज्यातील शेतकऱ्यांना शंभर पेक्षा अधिक शासकीय योजनेचा लाभ दिला जात आहे. या पोर्टलवरून राज्यातील शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कांदा चाळ, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित यंत्र, पॉलिहाऊस, शेडनेट यांसारख्या बाबींसाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. कृषी यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यांसारख्या एकना अनेक योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलवरून घेता येतो. यासाठी महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करावी लागते.
महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करणार?
यासाठी सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin या महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होम पेजवर नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसेल. या पोर्टलची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे पोर्टल मराठी मध्ये आहे. यामुळे नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही.
नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी नावाचे एक पेज ओपन होईल. या पेजवर अर्जदाराचे नाव टाकायचे आहे, वापरकर्त्याचे नाव म्हणजेच युजर नेम तयार करायचा आहे, पासवर्ड तयार करायचा आहे. तसेच ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि कॅपच्या कोड भरावा लागेल. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की पासवर्ड दोनदा प्रविष्ट करावा लागतो. म्हणजेच पासवर्ड कन्फर्म करावा लागतो. तसेच ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करावा लागतो. या वेरिफिकेशन साठी तुमच्या ईमेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो तो ओटीपी दिलेल्या रकान्यात तुम्हाला भरायचा आहे.
अशा पद्धतीने विचारलेली सर्व माहिती तुम्ही भरली की यानंतर नोंदणी करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची महाडीबीटी पोर्टलवर यशस्वीपणे नोंदणी होणार आहे. मात्र तुमचा मोबाईल क्रमांक हा आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
कोणत्या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?
महाडीबीटी पोर्टल वर शंभर पेक्षा अधिक योजनेचा लाभ घेता येतो. वेगवेगळ्या बाबींसाठी वेगवेगळे अनुदान शासनाकडून मिळते. यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 80% पर्यंत अनुदान दिले जाते. यात कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी, ट्रॅक्टर चलीत यंत्रांसाठी तसेच इतर कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान मिळते. यामध्ये विविध बाबीसाठी 40 टक्क्यांपासून ते 60 टक्क्यांपर्यंतचे अनुदान मिळते. विहिरीसाठी, पाईपलाईनसाठी देखील अनुदान मिळते.