आता घरबसल्या बनवता येणार रेशन कार्ड ! ‘या’ वेबसाईटवर सादर करावा लागणार अर्ज, पहा संपूर्ण प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Online : देशभरातील गरीब आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाकडून गरिबांना स्वस्तात धान्य देण्यासाठी देखील योजना चालवली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळापासून केंद्र शासनाकडून गरिबांना मोफत धान्य पुरवले जात आहे. अजूनही ही योजना सुरूच आहे.

मात्र धान्य घेण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत आज आपण रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा केला जाऊ शकतो याबाबत जाणून घेणार आहोत. रेशन कार्ड हे केवळ धान्य घेण्यासाठी वापरले जाते असे नाही तर याचा वापर शासकीय तसेच निमशासकीय कामांमध्ये देखील केला जातो.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी, ऍडमिशनसाठी रेशन कार्ड लागते. याव्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही रेशन कार्ड आवश्यक आहे. यामुळे आज आपण रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे

नागरिकांना रेशन कार्ड बनवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, सरकारने जारी केलेले कोणतीही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, विज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची पूर्तता नागरिकांना करावी लागणार आहे.

रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवायचे असेल तर यासाठी आपणांस राज्याच्या अन्न, पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. http://mahafood.gov.in/ या महाराष्ट्र शासनाचा अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपणास लॉग इन करावे लागणार आहे.

लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ‘NFSA 2013 अप्लिकेशन फॉर्म’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल. विचारलेली माहिती भरताना घाई करू नका. सरकारने जारी केलेल्या वैध कागदपत्रात जी माहिती असेल तीच माहिती या ठिकाणी भरा. तुमच्या कागदपत्रावर तुमच्या नावाची जी स्पेलिंग असेल तीच स्पेलिंग या ठिकाणी भरायची आहे.

माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील या वेबसाईटवर अपलोड करावे लागतील. माहिती अचूक भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर रेशन कार्ड साठी फि भरावी लागणार आहे. रेशन कार्डच्या प्रकारानुसार पाच रुपये ते 45 रुपये पर्यंतची शासकीय फि तुम्हाला भरावी लागणार आहे.

फि भरल्यानंतर मग तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड साठी सादर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेशन कार्ड साठी अर्ज केल्यानंतर जर अर्जदाराने सादर केलेली सर्व माहिती योग्य असेल तर साधारणता एका महिन्यात रेशन कार्ड मिळते.

Leave a Comment