ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ रस्ते प्रकल्पांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन नियोजित करण्यात आले आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये शासनाने इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत.

अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. राज्यात असे अनेक छोटे-मोठे प्रकल्प आहेत ज्यांचे अजूनही काम सुरूच आहे. दुसरीकडे काही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

यामध्ये अहमदनगर मधील अहमदनगर बायपास अर्थातच विळद बायपास आणि नगर-करमाळा रस्त्याचा देखील समावेश होतो. दरम्यान या दोन्ही प्रकल्पांचे आज अर्थातच 26 फेब्रुवारी 2024 रोजी लोकार्पण केले जाणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या दोन्ही प्रकल्पांमुळे शहरासह जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

नगर ते करमाळा दरम्यानच्या रस्त्यामुळे अहमदनगर ते सोलापूर हा प्रवास आणखी जलद आणि सुलभ होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या रस्त्यांमुळे आर्थिक विकास होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

यासोबतच या रस्त्यांमुळे शहरातील वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूक अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

साहजिकच यामुळे जिल्ह्यातील कृषी उद्योग शिक्षण पर्यटन इत्यादी क्षेत्र लाभान्वित होणार आहे. यामुळे जिल्ह्याला एकात्मिक विकास साधता येणे शक्य होणार आहे.

यावेळी खासदार महोदय यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील मानलेत.

Leave a Comment