जुहू ते मरीन ड्राईव्ह फक्त 30 मिनिटात ! अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय तो कोस्टल रोड प्रकल्प नेमका आहे तरी कसा ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amitabh Bacchan On Coastal Road : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे विविध प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राजधानी मुंबईत देखील अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यामध्ये मुंबई ते नवी मुंबई यांना जोडणारा अटल सेतू आणि कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. दरम्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान झाला आहे.

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना देखील वेगवान प्रवासाचा अनुभव आला असून त्यांनी आपला अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आपल्या वेगवान प्रवासाचा अनुभव शेअर करत सरकारचे कौतुक केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी 2 मे ला एक्स वर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये जुहू ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा प्रवास फक्त 30 मिनिटात. व्वा क्या बात है! स्वच्छ आणि नवीन छान रस्ता, कोणताही अडथळा नाही अशा शब्दात कोस्टल रोड प्रकल्पाचे कौतुक केले आहे. बच्चन यांनी सिलिंक म्हणजे अटल सेतू ते कोस्टल रोड ते अंडरग्राऊंड टनेल असा प्रवास केला आहे आणि हा प्रवास त्यांना अवघ्या 30 मिनिटात करता आला आहे.

यामुळे अमिताभ बच्चन भारावले आहेत आणि त्यांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. दरम्यान आज आपण अमिताभ बच्चन यांनी प्रशंसा केलेला कोस्टल रोड प्रकल्प नेमका आहे तरी कसा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे कोस्टल रोड प्रकल्प

मुंबई ते कांदिवली असा 29 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प आहे. याचे दोन भाग करण्यात आले आहेत. दक्षिण कोस्टल रोड आणि उत्तर कोस्टल रोड असे दोन भाग करण्यात आले असून यातील 10.58 किलोमीटर लांबीचा दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे.

दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 12,721 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

कोस्टल रोडच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. कोस्टल रोड आठ पदरी आहे तर बोगद्यातील मार्ग सहा पदरी आहे.

या प्रकल्पात 3 इंटरचेंज आहेत ज्यात महत्त्वाचं ठिकाण आहे वरळी, वरळी हा एक कनेक्टर स्पॉट असणार आहे, विशेष म्हणजे कोस्टल रोडसोबत 1800 वाहनांची क्षमता असणारी चार भूमिगत वाहनतळंही तयार केली आहेत, यापैकी 2 वाहनतळं वरळीत, 1 हाजी आली, महालक्ष्मी मंदिर आणि 1 वाहनतळ प्रियदर्शनी पार्क इथे आहे.

कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटरचेंज अमरसन्स गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. या इंटरचेंजची लांबी प्रत्येकी 15.66 किमी इतकी आहे. मरीन ड्राईव्हपासून ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत कोस्टल रोडवर दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत.

हे बोगदे तीन प्रकारचे आहेत, अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. या दक्षिण कोस्ट्रोल रोडमुळे मरिन ड्राईव्ह ते वरळी सीलिंक हे अंतर तब्बल 8 ते 10 मिनिटात पार करता येत असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Comment