गणपती आणि दिवाळीच्या सणाला मिळणार ‘आनंदाचा शिधा’ ! कोणत्या तारखेला मिळणार ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anandacha Shidha Maharashtra News : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी सणासुदीच्या दिवसात मोठी घोषणा केली आहे. नवोदित शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या दिवाळीत शिंदे सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला होता.

राज्य शासनाने त्यावेळी राज्यातील लाखो लोकांना याचा लाभ दिल्याने शासनाचे मोठे कौतुक करण्यात आले होते. यामुळे राज्य शासनाने यंदा गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी अर्थातच 14 एप्रिललाही आनंदाचा शिधा दिला होता. दरम्यान आता पुन्हा या दिवाळीला हा आनंदाचा शिधा देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.

दरम्यान या योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा शिधा आता ऑफलाईन पद्धतीने राज्यातील पात्र रेशन कार्ड धारकांना वितरित केला जाणार आहे. आता आपण हा शिधा राज्यातील कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणाला मिळणार याचा लाभ

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, याचा लाभ राज्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबीयांना दिला जाणार आहे. या अंतर्गत 100 रुपयात विविध जिन्नस रेशन कार्डधारकांना मिळणार आहेत. फक्त शंभर रुपयात या पात्र रेशन कार्डधारकांना 1 किलो साखर, 1 किला रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल या चार वस्तू दिल्या जाणार आहेत.

खरतर हा शिधा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ऑनलाइन पद्धतीने वाटप करण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आणि वेळेत नागरिकांना याचा लाभ मिळत नसल्याने आता ऑफलाइन पद्धतीने याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केव्हा मिळणार लाभ

याचा लाभ गणेशोत्सवाला आणि दिवाळीच्या सणाला मिळणार आहे. पुढल्या महिन्यात 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव 28 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच दिवाळीच्या सणाला 12 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.

या पार्श्वभूमीवर हा आनंदाचा शिधा या दोन्ही सणाच्या पूर्वीच दिला जाणार आहे. एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत पात्र शिधापत्रिका धारकांना याचा लाभ वितरित केला जाणार अशी माहिती समोर आली आहे. निश्चितच जर विहित कालावधीमध्ये पात्र रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळाला तर राज्यातील गोरगरीब जनतेचा गणपतीचा आणि दिवाळीचा सण गोड होणार यात शँकाच नाही.

Leave a Comment