सध्या आपण ऐकतो किंवा वाचतो की बाईक चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. कधी कधी तर आपले कुठे पाच मिनिटाचे काम असेल व त्या ठिकाणी जर आपण बाईक लावून त्या कामासाठी गेलो तर तेवढ्या कालावधीत देखील बाईक चोरीच्या घटना घडतात. अगदी सहजरित्या बाईक चोरीच्या घटना आपल्याला दिसून येतात.

एवढेच नाही तर रात्री आपल्या घरासमोर लावलेली बाईक देखील चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकच जण बाईक चोरीला जाऊ नये याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना किंवा प्रयत्न करताना दिसून येतात.

Advertisement

यासोबतच अशा बाईक बनवणाऱ्या कंपन्या देखील बाईक चोरीची घटना टाळण्यासाठी काही महत्त्वाची फीचर्स गाडीमध्ये देत असतात. परंतु या व्यतिरिक्त आपण स्वतः देखील आपली गाडी चोरीला जाऊ नये म्हणून काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणून आपण काही महत्त्वाच्या टिप्स या लेखात बघणार आहोत.

बाईक चोरीला जाऊ नये म्हणून या टिप्स ठरतील महत्त्वाच्या

Advertisement

1- अँटी थेप्ट अलार्म- गाडी चोरीला जाऊ नये म्हणून त्यामध्ये अँटी थेप्ट अलार्म बसवणे गरजेचे आहे. यामुळे कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीने तुमची गाडी चोरून येण्याचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजतो व तुम्ही सावध होतात. अलार्म बसवताना इतर वाहनांपेक्षा वेगळा आवाज येईल अशा पद्धतीचा अलार्म निवडावा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गाडीत बसवलेला अँटी थेप्ट अलार्म चा आवाज ओळखण्यास मदत होईल. तुम्ही अशा प्रकारचा अलार्म ऑनलाईन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.

2- किल स्विच इन्स्टॉल करा- अनेक बाईकमध्ये किल स्वीच असतो. यामुळे स्टार्ट प्लगमधील विजेचा पुरवठा बंद करून इंजिन पर्यंत पोहोचत नाही व त्यामुळे गाडी सुरूच होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही तो स्विच डिसेबल करता तेव्हाच गाडी सुरू होते. तसे पाहायला गेले तर ही सुविधा अनेक दुचाकींमध्ये दिलेली आहे. परंतु तुमच्या गाडीत ही सुविधा नसेल तर तुम्ही किल स्विच बसवून घेणे गरजेचे आहे.

Advertisement

3- वाहनाला लॉक लावणे- ही पद्धत आपल्यापैकी बरेच जण वापरतात. यामध्ये तुम्ही तुमच्या बाईकला दोन किंवा त्याहून अधिक लॉकचा वापर करू शकतात. त्यामध्ये डिस्क ब्रेक लॉक, हॅण्डल लॉक तसेच इग्निशन लॉक यासारख्या लॉकचा समावेश होतो. या प्रकारचे लॉकचा वापर जर तुम्ही केला तर तुमची दुचाकी म्हणजेच बाईक सुरक्षित राहते. ही चारही प्रकारचे लॉक अत्यंत फायद्याचे असून हे लॉक केल्यास गाडी जागेवरून हलणे अशक्य आहे.

4- एखाद्या अवजड वस्तूला गाडी बांधणे- जर तुम्ही एखाद्या मोठ्या किंवा अवजड वस्तुला तुमची बाईक बांधून ठेवली तरी फायदा होतो. एखादी मजबूत साखळी किंवा पॅडलॉकच्या मदतीने तुम्ही एखाद्या अवजड वस्तूला तुमची गाडी बांधून ठेवू शकतात व तुमची दुचाकीचे चोरीपासून संरक्षण करू शकतात. अशा पद्धतीने या छोट्या परंतु उपयुक्त अशा टिप्सचा वापर जर तुम्ही केला तर तुमची बाईक चोरी होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *