Ashadhi Ekadashi Special Railway :- सध्या वारकऱ्यांची मांदियाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने चालू लागली असून अनेक पायी दिंड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीकडे प्रस्थान केलेले आहे. तसेच अनेक भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता यावे याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्गाने देखील अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून भाविकांना पंढरपूरला जाताना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि गाड्यांची उपलब्धता व्हावी या दृष्टिकोनातून या बसेस सुरू करण्यात आलेले आहेत.
याच अनुषंगाने भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने देखील या ठिकाणी होणारी अतिरिक्त गर्दी कमी करता यावी याकरिता दक्षिण मध्य रेल्वेने देखील जालना ते पंढरपूर, पंढरपूर ते नांदेड, औरंगाबाद ते पंढरपूर आणि आदीलाबाद पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशी निमित्त विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण या गाड्यांचे वेळापत्रक आणि या अतिरिक्त गाड्यांचा थांबा याबद्दल माहिती घेणार आहोत.
जालना ते पंढरपूर स्पेशल ट्रेन
या कालावधीत जालना ते पंढरपूर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार असून त्यातील गाडी क्रमांक 07511 आषाढी स्पेशल ही जालना या ठिकाणी 27 जून रोजी मंगळवारी सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात वाजून 30 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. हीच रेल्वे क्रमांक 07512 ही विशेष रेल्वे पंढरपूर येथून 28 जून रोजी सव्वा आठ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता नांदेडला पोहोचेल
या गाडीचे थांबे
ही गाडी कुर्डूवाडी, बार्शी टाउन तसेच उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा येथे थांबे देण्यात आले आहेत.
औरंगाबाद ते पंढरपूर विशेष दोन गाड्या
यामध्ये गाडी क्रमांक 07515 विशेष गाडी औरंगाबाद या ठिकाणाहून 28 जून रोजी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता पंढरपूरला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 07516 ही विशेष गाडी पंढरपूर येथून 29 जून रोजी साडेअकरा वाजता सुटेल आणि औरंगाबादला दुसऱ्या दिवशी दुपारी पावणे दोन वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे
या गाड्यांना जालना, परतुर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर, लातूर रोड, उस्मानाबाद, बार्शी टाउन आणि कुर्डूवाडी या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
आदिलाबाद ते पंढरपूर विशेष दोन गाड्या
यामध्ये ट्रेन क्रमांक 07501 विशेष गाडी आदीलाबाद या ठिकाणहून 28 जून रोजी रात्री अकरा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 07504 ही स्पेशल गाडी पंढरपूरहुन 29 जून रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि आदिलाबादला दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.
या गाड्यांना देण्यात येणारे थांबे
या गाड्यांना सोलापूर, कुर्डूवाडी कलबुर्गी, वाडी, चित्तापूर, सेदाम, तंदूर, विकाराबाद, जहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, धानोरा( डेक्कन), बोदरी आणि किनवट या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.