Mumbai Property News : मुंबईतील मिनी गोवा – मुंबईतील ‘या’ ठिकाणी घ्या घर, गोव्यातील निसर्ग सौंदर्याचा येईल अनुभव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Property News :गोवा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते ते समुद्रकिनारा आणि किनाऱ्यालगत असलेले नारळाचे आणि पोफळीचे झाडे, थंडगार वाहणारी वारे आणि तर निसर्गाने ओतप्रोत भरलेली सौंदर्य स्थळे आणि त्यांचे अनुभूती घेत गोव्याचे निसर्ग सौंदर्य अनुभवताना माणसाला भुरळ पडते. अगदी त्याच पद्धतीने जर आपल्याला गोव्याचे अनुभूती घ्यायची असेल तर आपल्या महाराष्ट्रात असलेल्या वसई हे ठिकाण खूप आकर्षक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. वसईचे सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी असलेला किल्ला. जेव्हा व्यक्ती या किल्ल्यातून फिरतो तेव्हा आपल्याला अनेक इतिहासकालीन खानाखुणा या ठिकाणी पाहायला मिळतात. जेव्हा व्यक्ती या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जातो तेव्हाच आपल्याला या किल्ल्याची भव्य दिव्यता किती असेल याबाबतचा अंदाज बांधता येतो. सात चर्च आणि चार मंदिरे असलेला हा किल्ला एकमेव असावा. हे व अशा अनेक प्रकारचे प्रेक्षणीय स्थळे वसईला आहेत.

वसईचे निसर्ग सौंदर्य म्हणजेच गोव्याची अनुभूती
वसई आणि गोवा या मधील साम्य पाहिले तर वसई मध्ये केळी व नारळ तसेच पोफळीच्या सहवासामध्ये अनेक चर्च आणि मंदिरे आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी असलेल्या चर्च आणि त्या चर्चच्या आवारात असलेली मनोरे आणि मंदिरामध्ये असलेल्या घंटांचा घंटानाद अनेक दूरवरच्या गावांपर्यंत ऐकू जातो. तसेच वसईच्या रस्त्यांवर जेव्हा व्यक्ती फिरतो तेव्हा त्याला पार्श्व संगीत कायम सुरू असते. जेव्हा नाताळाचा कालावधी असतो तेव्हा अख्खी वसई प्रकाशमान होऊन प्रकाशामध्ये न्हावून निघते. वसईचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी धार्मिक वास्तू तर आहेतच परंतु जुन्या पद्धतीचे लाकडी बांधकाम असलेली घरे देखील खूप मोठ्या प्रमाणावर असून लक्ष वेधून घेणारे आहेत. या ठिकाणाचे बागबगीचे तसेच घरांची केलेली व्यवस्थित रचना पाहून आयुष्याच्या शेवटचे दिवस या ठिकाणी व्यतीत करण्याचा विचार देखील बऱ्याचदा येऊ शकतो.

वसईचे समुद्रकिनारे म्हणजेच निसर्गनगरी
गोव्याप्रमाणेच वसईला देखील समृद्ध समुद्रकिनारा लाभला असून त्यातील सुरू, भुईगाव आणि रानगाव या समुद्रकिनाऱ्यावर कायमच पर्यटकांची गर्दी असते. यापैकी आपण सुरूच्या समुद्रकिनाऱ्याचा विचार केला तर या ठिकाणी उंचच उंच नारळाची झाड असून या ठिकाणी झाडांच्या सावलीतून आणि समुद्रकिनारी असलेल्या वाळूतून चालण्याची एक मजाच वेगळी असते. तसेच रानगाव समुद्रकिनाऱ्याचा विचार केला तर याचा रस्ता गावागावातून जातो. भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर निवांतपणे बसून सूर्यास्त पाहता येतो. वसई समुद्रकिनाऱ्याचा विचार केला तर या ठिकाणी अनेक छोटे छोटे रेस्टॉरंट असून या ठिकाणी उत्तम प्रकारे माशांचे जेवण मिळते.

वसईला असणारी कनेक्टिव्हिटी
जर आपण वसई या शहराचा विचार केला तर हे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 48 या माध्यमातून जोडले गेले असून यातील बहुसंख्य प्रवासी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी जाण्यासाठी या पश्चिम मार्गाचा वापर करतात. वसई रोड रेल्वे स्टेशन हेदेखील प्रवासासाठी सुकर असून ते मुंबईच्या उपनगर रेल्वे नेटवर्कच्या पश्चिम मार्गावर आहे. तसेच दादर, लोअर परेल, मालाड तसेच गोरेगाव आणि अंधेरी हे दक्षिणेकडील सुप्रसिद्ध असलेले मुंबईतील काही भागांशी देखील वसई जोडली गेलेली आहे.तसेच या ठिकाणहून चर्चगेटला जायचं असेल तर ते देखील आता सोपे आहे. भविष्यामध्ये या ठिकाणचे डीएमआयसी, एम एम आर डी ए चा रिंग रोड तसेच बुलेट ट्रेन आणि मेट्रो सारखे जे काही प्रकल्प आहेत त्यामुळे या ठिकाणचे म्हणजे या ठिकाणी जलवाहतुकीचे जाळे देखील विस्तारण्यास मदत होणार असून तशी तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये सरकारने केलेली आहे. येणाऱ्या कालावधीत ठाणे आणि वसई खाडी एकमेकांना जोडली जाणार असून त्याकरिता 424 कोटी रुपयांची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी जलवाहतुकीकरिता जेट्टी आणि इतर महत्त्वाच्या सुविधा देखील उभारता याव्यात याकरिता 162 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता दक्षिण मुंबईतून कल्याण, डोंबिवली, वसई खाडी अशी जलवाहतूक शक्य होणार आहे. तसेच या ठिकाणी होऊ घातलेला विरार- अलिबाग बहुउद्देशीय महामार्गीकीच्या कामाला देखील आता सुरुवात होण्याची शक्यता असून हा या परिसराच्या औद्योगिक व आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा कॉरिडॉर आहे.

या ठिकाणी घर घेणे कसे आहे फायद्याचे?
मुंबईतील एक रम्य ठिकाणी असलेले वसईला घर घेण्याला अनेक जण पसंती देतात. या ठिकाणी तुम्हाला निवासी आणि कमर्शियल अर्थात व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. या ठिकाणी फ्लॅट्स, प्लॉट्स तसेच स्टुडिओ आपारमेंट, बिल्डर फ्लॉवर्स आणि स्वतंत्र घरी देखील उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या सुरक्षा स्मार्ट सिटी मुळे आता वसई स्टेशन पासून थोड्या अंतरावर असलेल्या या प्रकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना चांगली जीवनशैली या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या ठिकाणी असलेले क्लब हाऊस, स्विमिंग पूल तसेच क्रिकेटची मैदान आणि बरच काही सुविधा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अलॉट हाउसिंग अलॉटमेंट स्कीममुळे या ठिकाणी घर बुक करणाऱ्यांना तीन लाखांच्या हातात घर मिळू शकणार आहे. या ठिकाणी घेतलेले घर तुम्हाला राहण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी देखील फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वसईमध्ये घर घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच ते फायद्याचे ठरू शकणार आहे.

Leave a Comment