ATM Charges : आजची ही बातमी बँक खातेधारकांसाठी विशेष कामाची राहणार आहे. विशेषता ज्या बँक खातेधारकांकडे एटीएम असेल अशांसाठी ही बातमी खूपच उपयुक्त ठरणार आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये आता एटीएममधून चार पेक्षा अधिक वेळा पैसे काढले तर प्रति ट्रांजेक्शन 173 रुपये चार्जेस द्यावे लागतील असा दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे आज आपण सोशल मीडियामध्ये वेगाने वायरल होत असलेला हा मेसेज खरा आहे का ? याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये यूपीआय पेमेंट ला विशेष महत्त्व आले आहे.
प्रत्येक ठिकाणी युपीआय पेमेंट अप्लिकेशनच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारले जात आहे. यामुळे फोन पे, गुगल पे, पेटीएम अमेझॉन पे यांसारख्या एप्लीकेशनचा वापर वाढला आहे. मात्र आजही काही ठिकाणी कॅशनेच पेमेंट करावे लागते.
अशावेळी बँकेतून कॅश काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. दरम्यान जर तुम्ही एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. एटीएम कार्डचा वापर करून एटीएम मशीनमधून पैसे काढणाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे.
सोशल मीडियातील व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, तुम्ही एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास, 150 रुपये कर आणि 23 रुपये सेवा शुल्क म्हणजेच जीएसटी भरावी लागणार आहे.
अर्थातच एटीएममधून चार पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास एटीएम धारकाला आता एकूण 173 रुपये चार्जेस द्यावे लागतील असा दावा या मेसेज मध्ये करण्यात आला आहे. तसेच बँकेत 4 व्यवहार केल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये शुल्क आकारले जाईल, असा दावा यामध्ये केला जात आहे.
यामुळे सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असलेला हा मेसेज खरा आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेला हा दावा पूर्णपणे निरर्थक आहे.
खरे तर प्रत्येक महिन्याला ATM मध्ये 5 ट्रांजेक्शन मोफत आहेत. तसेच महिन्याला पाच ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 21 रुपये एवढे चार्जेस आकारले जातात.
जर एखाद्या ग्राहकाने दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरल्यास, मेट्रो शहरांमध्ये एका महिन्यात 3 आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार विनामूल्य उपलब्ध होत आहेत.
तसेच नॉन-मेट्रो शहरांसाठी ATM चे 5 व्यवहार विनामूल्य आहेत. पण, मोफत व्यवहारानंतर 21 रुपये प्रति ट्रांजेक्शन एवढे कमाल शुल्क आकारले जाऊ शकते.