होम लोन घेतांना बँकेला कोण-कोणते चार्जेस द्यावे लागतात ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan : अलीकडे घराची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घराच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आता गृह खरेदीसाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, जर तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची राहणार आहे.

खरेतर अलीकडे विविध बँका स्वस्त व्याजदरात सर्वसामान्यांना गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. जर सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध होते. मात्र असे असले तरी गृह कर्ज घेताना बँकेकडून काही चार्जेस देखील वसूल केले जातात. विशेष म्हणजे हे चार्जेस नॉन रिफंडेबल असतात.

यामुळे गृह कर्ज घेताना या गोष्टीची सर्वसामान्य विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या बँकेंकडून गृह कर्जासाठी वेगवेगळे चार्जेस आकारले जातात. यामुळे कोणत्याही बँकेकडून गृह कर्ज घेताना या अतिरिक्त चार्जेसची माहिती जाणून घेतली पाहिजे आणि त्यानंतरच कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घ्यावे हे ठरवले पाहिजे.

म्हणजेच गृह कर्ज घेताना बँकेकडून आकारले जाणारे अतिरिक्त चार्जेस आणि व्याजदर याची तुलना करून यामध्ये ज्या बँकेकडून स्वस्तात गृह कर्ज मिळत असेल त्या बँकेकडून गृह कर्ज घेणे ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहे. 

बँका गृह कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेतात 

बँकांकडून गृह कर्ज स्वस्त व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते. मात्र गृह कर्ज देताना बँका प्रोसेसिंग फी देखील वसूल करतात. ही प्रोसेसिंग फी बँकेनुसार बदलत असते. म्हणजेच एसबीआय आणि एचडीएफसी बँक यांच्या होम लोनसाठीच्या प्रोसेसिंग फी मध्ये बदल राहणार आहे.

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हे शुल्क तुमच्या होम लोनच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी आकारले जाते. या फीचा तुम्हाला कर्ज मिळेल की नाही याच्याशी काहीही संबंध नाही आणि ते परत होत नाही. म्हणजेच तुम्हाला कर्ज मिळो अथवा कर्ज न मिळो ही फी तुम्हाला भरावी लागते आणि ती पूर्णपणे नॉन रिफंडेबल असू शकते.

म्हणजे तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे अर्ज सबमिट केल्यास आणि नंतर तुमचा विचार बदलल्यास, तुमची ही प्रोसेसिंग फी वाया जाईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे याची खात्री करा आणि मगच सदर बँकेत गृह कर्जासाठी अर्ज करा.

प्रोसेसिंग फी मध्ये सूट मिळणार का?

अनेकांकडून बँकेच्या माध्यमातून प्रोसेसिंग फी माफ केली जाऊ शकते का असा सवाल उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की प्रोसेसिंग शुल्क शुल्क कर्जासाठी अर्ज करण्यासोबतच आकारले जाते. हे प्रक्रिया शुल्क परत केले जात नाही.

परंतु, काही बँका या फीचा काही भाग अर्जासोबत आणि उर्वरित रक्कम कर्ज मिळण्यापूर्वी भरण्याची परवानगी देतात. हे शुल्क एकतर फ्लॅट असते किंवा कर्जाच्या टक्केवारीनुसार, वित्तीय संस्था किंवा बँकेद्वारे निर्धारित केले जाते.

बँकेची इच्छा असेल तर ती ही फी माफही करू शकते. यासाठी मात्र तुम्हाला बँकेकडे विनंती करावी लागेल. जर तुम्ही बँकेला योग्य पद्धतीने समजावण्यात सक्षम ठरलात तर तुमची ही फी माफ होऊ शकते.

Leave a Comment