Axis Bank FD Rate : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच एक फेब्रुवारी 2024 ला केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात केंद्र शासनाकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा होतील अशी आशा होती.
याचे कारण म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये लगेचचं देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण केंद्र शासनाने या अंतरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा करणे टाळले आहे.
त्यामुळे काही तज्ञ लोकांनी या बजेटची प्रशँसा केली आहे तर काही लोकांनी या बजेटवर टिका केली आहे. दरम्यान बजेट नंतर आता विविध घडामोडी घडत आहेत.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच 3 फेब्रुवारीला एचडीएफसी या देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेने बल्क एफडी वरील व्याजदरात थोडी वाढ केली होती.
आज अर्थातच 5 फेब्रुवारी 2024 ला ॲक्सिस बँक या देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील एका महत्त्वाच्या बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता चांगला परतावा मिळेल अशी आशा आहे. ॲक्सिस बँकेने 18 महिने ते 2 वर्षांच्या FD वरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवले आहेत.
आतापर्यंत ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून या कालावधीच्या एफडीवर ७.१० टक्के एवढे व्याज ऑफर केले जात होते. आता मात्र या व्याजदरात मोठा बदल करण्यात आला आहे. बँकेने हे व्याजदर वाढवून ७.२० टक्के केले आहे.
हे नवीन दर आजपासून म्हणजे 5 फेब्रुवारीपासून लागू राहणार आहेत.नवीन सुधारणांनंतर ऍक्सिस बँकेकडून सामान्य ग्राहकांना FD साठी 3 टक्के ते 7.10 टक्के एवढे व्याज मिळणार आहे.
त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या माध्यमातून 3.50 ते 7.60 टक्के व्याज ऑफर केले जाणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्ष ते दहा वर्ष या कालावधीच्या एफडीकरीता ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याज ऑफर केले जाणार आहे.
एकंदरीत ॲक्सिस बँकेने आजपासून 18 महिने ते दोन वर्षाच्या एफडीवरील व्याज दर 0.10 टक्क्यांनी वाढवले असल्याने याचा गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना यामुळे अधिकचा परतावा मिळू शकणार आहे.