पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना, एकदा 15 लाखाची गुंतवणूक केली की दरवर्षी मिळणार लाखोंचा परतावा, मृत्यू झाल्यास….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : आपल्या देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी गुंतवणूक करता येते. काही गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या रिस्की ठिकाणी गुंतवणूक करतात.

तर काही लोक बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना यांसारख्या सुरक्षित योजनेमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.

मेहनतीने कमावलेला पैसा लॉस मध्ये जाऊ नये यासाठी सुरक्षित गुंतवणुकीला आजही आपल्या देशात विशेष महत्त्व आहे यात शंकाच नाही. अलीकडे मात्र सुरक्षित गुंतवणुकीच्या ट्रेंडमध्ये थोडासा फरक पाहायला मिळत आहे.

आधी महिला गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व देत असत. आता मात्र सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्याही अनेक बचत योजनांमध्ये गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसची अशी एक बचत योजना समजून घेणार आहोत ज्यामध्ये एकदा 15 लाखाची गुंतवणूक केली की गुंतवणूकदारांना दरवर्षी चांगला परतावा मिळू शकणार आहे.

कोणती आहे ती योजना ?

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही देशातील एक लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेत केलेली गुंतवणूक ही 80 सी अंतर्गत कर बचतीस पात्र देखील आहे. दरम्यान आज आपण या योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती व्याजदर मिळते

या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक केली जाऊ शकते. विशेष म्हणजे गुंतवणुकीसाठी मॅक्सिमम लिमिट ठेवण्यात आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराकडे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे तो या योजनेत गुंतवू शकतो. या योजनेचा लॉक इन पिरियड हा पाच वर्षांचा आहे. म्हणजे ही योजना पाच वर्षात परिपक्व होते.

5 वर्षानंतर गुंतवणूकदाराला त्याने गुंतवलेली रक्कम पूर्णपणे परत मिळते. तसेच गुंतवलेल्या रकमेवर व्याज देखील मिळते. विशेष बाब म्हणजे या योजनेत एकापेक्षा अधिक व्यक्ती ही गुंतवणूक करू शकतात. यासाठी जॉइंट अकाउंट ओपन करावे लागते. या योजनेत फक्त आणि फक्त भारतीयांना गुंतवणूक करता येते.

15 लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, जर या योजनेत 15 लाख रुपये गुंतवलेत तर 7.7% व्याजदराने मॅच्युरिटी वर अर्थातच पाच वर्षांनी गुंतवणूकदाराला 21 लाख 73 हजार 551 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 6 लाख 73 हजार 551 रुपये एवढे पैसे व्याजाच्या स्वरूपात गुंतवणूकदाराला मिळणार आहेत.

म्हणजेच या योजनेत एकदा पंधरा लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास वार्षिक आधारावर 1 लाख 34 हजार 710 रुपये गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा मॅच्युरिटीआधीच मृत्यू झाला तर यातील पैसा हा सदर गुंतवणूकदाराच्या वारसाला वेळेच्या आधीच दिला जाऊ शकतो. 

Leave a Comment