Ayodhya Property News : उद्या अर्थातच 22 जानेवारी 2024 या ऐतिहासिक दिवशी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामजी विराजमान होणार आहेत. भव्य मंदिरात उद्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर हे भव्य मंदिर रामभक्तांना समर्पित केले जाणार आहे. हे मंदिर राष्ट्राला समर्पित झाल्यानंतर येथे जगातील तमाम राम भक्त येऊन प्रभू श्री राम चरणी लीन होऊ शकणार आहेत. दरम्यान गेल्या पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर तयार होत असल्याने रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
भारतात सर्वत्र या मंदिर उद्घाटन सोहळा च्या पार्श्वभूमीवर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हा सोहळा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहता येतोय हे आपले परम भाग्य असल्याचे रामभक्त नमूद करत आहेत. उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आणि मंदिर उद्घाटनासाठी जगभरातील 7 हजाराहून अधिक व्हीव्हीआयपी लोक श्रीक्षेत्र आयोध्या येथे जमा होणार आहेत. या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
विशेष म्हणजे प्रभू श्री रामजीचे मंदिर रामभक्तांसाठी खुले झाल्यानंतर या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होणार आहेत. देश-विदेशातील लोक येथे येतील. यामुळे श्रीक्षेत्र अयोध्या येथे रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अयोध्या येथील जमिनीचे आणि घरांचे भाव चार ते दहा टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे भव्य राम मंदिरामुळे येथील होम स्टे चा व्यवसाय देखील भरभराटीस आला आहे.
विशेष म्हणजे आगामी काळातही येथील रियल इस्टेट क्षेत्रातली तेजी अशीच कायम राहणार अशी शक्यता आहे. दरम्यान जर तुम्हालाही श्रीक्षेत्र अयोध्या येथे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल, घर जमीन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. कारण की आज आपण अयोध्या येथे प्रॉपर्टी खरेदी करताना गुंतवणूकदाराने काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रॉपर्टी खरेदी करताना ही काळजी घ्या
अयोध्येत रियल इस्टेटचे भाव वाढत आहेत. यामुळे एखादे प्रॉपर्टी कमी किमतीत मिळत असली तर लगेच उडी हाणू नका. आधी त्या प्रॉपर्टीची सर्व माहिती कलेक्ट करा नाहीतर तुमच्यासाठी भविष्यात अडचणी उभ्या राहू शकतात. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी उपनिबंधक कार्यालयाकडून सदर मालमत्ता कर्जमुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र काढून घ्या. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी 15 दिवस आधी हे प्रमाणपत्र तुमच्याकडेच असणे आवश्यक आहे. यावरून तुम्हाला या प्रॉपर्टीवर कोणतेच कर्ज नसल्याचे समजणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावा लागू शकतो.
तुम्ही अयोध्याची प्रॉपर्टी घेऊ इच्छित आहात त्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज असेल तर विक्रेत्याला आधी ती प्रॉपर्टी नील करण्यास सांगा. सर्व कर्ज, टॅक्स आणि शुल्क (असल्यास) भरलेत की नाही याची खात्री करा, जेव्हा ही प्रॉपर्टी कर्जातून मोकळी होईल तेव्हा याच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करा.
रियल इस्टेट मधील जाणकार लोकांनी म्हटल्याप्रमाणे, व्यवहार पूर्ण करण्यासाठी एक कालमर्यादा निर्धारित करा आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहार त्याच कालावधीत पूर्ण करा. मालमत्ता विकण्यासाठी गृहनिर्माण संस्थेकडून परवानगी किंवा ना-हरकत प्रमाणपत्र सुद्धा घ्यावे लागते. याशिवाय आयकर विभाग, सिटी लँड सीलिंग ट्रिब्युनल किंवा नगरपालिकेची परवानगी नक्की घेतली पाहिजें. या सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही विक्रेत्याकडून प्रॉपर्टी खरेदी केली पाहिजे म्हणजे भविष्यात तुम्हाला अडचण सहन करावी लागणार नाही.
जर तुम्ही अयोध्येत प्रॉपर्टी शोधत असाल तर रियल इस्टेटच्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही प्रॉपर्टी शोधू शकणार आहात. मात्र कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी आधी तिची संपूर्ण चौकशी करा. एजंटच्या माध्यमातून अर्थातच ब्रोकर्सच्या माध्यमातून प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर आधी ब्रोकरची विश्वसनीयता चेक करा. फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर प्रॉपर्टी हातची जाईल असं म्हणून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका.
मालमत्तेशी निगडीत वेगवेगळ्या बाबी चेक केल्यानंतर जेव्हा तुम्ही मालमत्ता खरेदीचा विचार कराल तेव्हा देखील विशेष काळजी घ्यायची आहे. प्रॉपर्टीच्या विक्री करारामध्ये मालकी हस्तांतरण, पेमेंट पद्धती, पैशांची देवाणघेवाण, मुद्रांक शुल्क, मध्यस्थ इत्यादींबद्दल माहिती दिलेली असते. तसेच मालमत्तेवर जमीन करार आहे की नाही हे देखील जाणून घ्या. या सर्व बाबी तपासून झाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण करा.
प्रॉपर्टीच्या खरेदीत तुम्ही पेमेंट मासिक आधारावर देणार आहेत की एकाच वेळी भरायचे आहे हे व्यवहारात स्पष्टपणे नमूद करायला हवे. दरम्यान अशा कोणत्याही प्रकारच्या करारामध्ये दोन्ही पक्षांची लेखी संमती आवश्यक असते, यामुळे प्रॉपर्टीचा करार करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या.