म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीला अखेर मुहूर्त मिळाला, ‘या’ दिवशी निघणार लॉटरी, हजारो नागरिकांना मिळणार घर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणून आता अनेकजण म्हाडा आणि सिडको कडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या किमतीच्या घरांची खरेदी करत आहेत. यासाठी अनेक जण म्हाडाच्या घरांच्या योजनेची आतुरतेने वाट पाहत असतात.

दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हाडा कोकण मंडळाने 5 हजार 311 घरांसाठी नवीन योजना जाहीर केली होती. या घरांसाठी 15 सप्टेंबर 2023 ला ऑनलाइन अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली.

या ऑनलाइन अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला नागरिकांच्या मागणीनुसार मुदतवाढ देखील मिळाली. अखेरकार तीस हजार 687 लोकांनी या सोडतीसाठी अर्ज सादर केलेत. यापैकी 24,303 लोकांनी अनामत रक्कम भरून अर्ज सादर केला आहे.

या सोडतीसाठीची पहिली प्रारूप यादी चार डिसेंबरला सादर झाली यानंतर अंतिम यादी 11 डिसेंबरला जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे या घरांसाठी 13 डिसेंबर 2023 ला लॉटरी काढली जाणार होती.

पण, ठाणे शहर व जिल्हा, पालघर , रायगड , सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच हजार 311 घरांसाठीची सोडत काही प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. तेव्हापासून या 5311 घरांची लॉटरी रखडली आहे.

यामुळे या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या माध्यमातून कोकण मंडळाच्या या घरांसाठी लॉटरी अखेर जाहीर केव्हा होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर म्हाडा कोकण मंडळाच्या या रखडलेल्या लॉटरी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनामत रक्कमेसह अर्ज केलेल्या 24,303 लोकांमधून आता या घरांसाठी भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यासाठीची लॉटरी 26 जानेवारी 2024 ला निघेल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

सूत्रांच्या माध्यमातून मीडिया रिपोर्ट मध्ये या कोकण मंडळाच्या पाच हजार 311 घरांची रखडलेले लॉटरी 26 जानेवारी 2024 अर्थातच प्रजासत्ताक दिनी जाहीर होणार असल्याचा मोठा दावा केला जात आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कोकण मंडळाच्या लॉटरीची वाट पाहिली जात होती ती लॉटरी प्रत्यक्षात लवकरच जाहीर होणार असे बोलले जात आहे. तथापि याबाबत मंडळाच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यामुळे ही लॉटरी खरंच 26 जानेवारीला निघणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान मंडळाने अर्ज केलेल्या अर्जदारांना एसएमएस करून लॉटरीचा दिनांक आणि वेळ कळवला जाईल असे सांगितले आहे.

Leave a Comment