Ayushman Bharat Card:- देशातील गरिब आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आरोग्य विमा किंवा आरोग्य विषयक काही आपत्कालीन मोठ्या प्रमाणावर जर खर्च करण्याची वेळ आली तर इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणे अशा व्यक्तींना शक्य नसते. म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे व तिलाच आपण आयुष्य भारत असे देखील म्हणतो.
सध्या या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आलेली असून नुकता सादर करण्यात आलेल्या 2024 च्या अर्थसंकल्पात देशातील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश देखील या योजनेत करण्यात आलेला आहे. जे नागरिक या योजनेसाठी पात्र असतात त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड जारी केले जाते.
या कार्डाच्या माध्यमातून काही सूचीबद्ध म्हणजेच लिस्टेड हॉस्पिटल असून त्यामध्ये पात्र नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जातात अशा लिस्टेड हॉस्पिटलमध्ये या योजनेत पात्र असलेल्या व्यक्तीला पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचारास नकार दिला जाऊ शकत नाही.
परंतु तरीदेखील आयुष्यमान कार्डधारकांना रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नाहीत किंवा मोफत उपचार दिले जात नाहीत अशी प्रकरणे अनेकदा समोर आलेली असून यामुळे आयुष्यमान कार्ड असून देखील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या समस्येवर उपाय म्हणून जर तुमच्याकडे देखील आयुष्यमान कार्ड असेल व या योजनेत सूचीबद्ध हॉस्पिटल ने जर मोफत उपचार करण्यास टाळाटाळ केली किंवा योग्य उपचार केले नाहीत असे तुम्हाला वाटले तर तुम्ही आता तक्रार करू शकणार आहात.
या टोल फ्री क्रमांकावर करू शकता तक्रार
आयुष्यमान भारत योजनाचा राष्ट्रीय स्तरावरील टोल फ्री क्रमांक असून त्यावर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणारा नागरिक अशा प्रकरणाची तक्रार करू शकतो. याकरिता राष्ट्रीय स्तरासाठी 14555 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला असून या क्रमांकाशिवाय राज्यानुसार वेगवेगळे टोल फ्री क्रमांक देखील जारी करण्यात आलेले आहेत.
उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये राहत असाल तर तुम्ही 1800-1800-4444 या टोल फ्री क्रमांक वर या प्रकारची तक्रार करू शकतात व तुम्ही जर मध्यप्रदेश राज्यात राहत असाल तर 1800-2332-085 या टोल फ्री क्रमांक वर तक्रार करू शकतात.
एवढेच नाही तर या योजनेमध्ये जे काही हॉस्पिटल सहभागी आहेत त्यांना त्यांच्या हॉस्पिटलच्या बोर्डवर देखील आयुष्यमान योजनेचा टोल फ्री क्रमांक देण्याच्या सूचना त्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत.
तुम्ही पोर्टलवर देखील करू शकता तक्रार
समजा तुम्ही टोल फ्री क्रमांक वर तक्रार करून देखील जर त्याची दखल घेतली गेली नाही असे तुम्हाला दिसून आले तर तुम्ही या योजनेच्या तक्रार पोर्टलवर देखील तक्रार नोंदवू शकता तो यासाठी तुम्हाला https://cgrms.pmjay.gov.in/GRMS/loginnew.html या लिंक वर क्लिक करून तक्रार नोंदवावी लागेल. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तुमची तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करून या प्रकरणाची तक्रार करावी लागेल.
अशाप्रकारे सोडवली जाते तुमची तक्रार
तुम्ही टोल फ्री क्रमांक वर किंवा पोर्टलवर एखाद्या प्रकरणाची तक्रार केल्यास संबंधित अधिकाऱ्याला तक्रारीचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या जातात. एवढेच नाही तर जिल्हास्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाते व जी अशा तक्रारीची चौकशी करून कारवाई करते.