Education Scholarship: अमेरिका व ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे? तर मिळत आहे 82 लाखांची शिष्यवृत्ती! असा कराल अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Education Scholarship:- उच्च शिक्षण म्हटले म्हणजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शुल्क म्हणजेच पैसा लागतो. परंतु आपल्याला माहित आहे की असे अनेक विद्यार्थी आपल्याला दिसून येतात त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता असते म्हणजेच ते खूप हुशार असतात.

परंतु आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असल्यामुळे अशा हुशार विद्यार्थ्यांना इच्छा असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही व त्यातल्या त्यात विदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न तर दूरच राहते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात

व अशा शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. जेणेकरून आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये हा त्यामागचा उद्देश असतो.

आपल्याला अशा अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सांगता येतील. अशा शिष्यवृत्ती योजनांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना इनलॅक्स शिवदासानी स्कॉलरशिप(inlaks Shivdasani Scholarships) ही शिष्यवृत्ती इनलॅक्स शिवदासानी फाउंडेशनच्या माध्यमातून दिली जाते. याविषयीचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

इनलॅक्स शिवदासानी शिष्यवृत्तीचे स्वरूप

या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भारतातील विद्यार्थ्यांना अमेरिका, ब्रिटन किंवा युरोप मधील उच्च संस्थांमध्ये एमफिल, मास्टर्स डिग्री किंवा डॉक्टरेट अशा प्रकारच्या पदव्या मिळवण्यासाठी सहाय्य केले जाते. ही शिष्यवृत्ती योजना 1976 पासून विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली असून शिवदासांनी फाउंडेशनच्या संकेतस्थळावर याबद्दलची माहिती दिलेली आहे

व त्यानुसार पाहिले तर  या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना 6 फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार असून यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ही 22 मार्च अशी आहे. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत  भारतीय विद्यार्थ्यांना सुमारे 82 लाख 97 हजार रुपये म्हणजेच एक लाख युएस डॉलर इतकी आर्थिक मदत दिली जाते.

तसेच यामध्ये राहण्याचा खर्च तसेच आरोग्यसेवा  व एका बाजूचा विमान प्रवासाचा खर्च देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये इनलॅक्स शिवदासानी फाउंडेशन यांचा रॉयल कॉलेज ऑफ आर्ट, केंब्रिज विद्यापीठ( केंब्रिज ट्रस्ट), किंग्स कॉलेज लंडन( पीएचडी विद्यार्थ्यांसाठी) आणि हर्टी यांच्यासोबत संयुक्त शिष्यवृत्ती व्यवस्था आहे.

 याचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट, रिझ्युम, फोटो तसेच ऑफर लेटर, फि स्टेटमेंट अतिरिक्त फंडिंग पदवी प्रमाणपत्राचा पुरावा आणि मार्कशीट कोर्स संबंधित पोर्टफोलिओ/ लिंक/ लेखनाचे नमुने तसेच टोफेल, जीआरई, आयईएलटीएस स्कोर शीट, अनुदान आणि शिष्यवृत्ती इत्यादी बद्दल माहिती अशी काही कागदपत्रे लागतात.

 या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता

1- या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवाराचा जन्म एक जानेवारी 1994 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा व त्याने भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवणे गरजेचे आहे.

2- समजा तुम्ही परदेशी विद्यापीठातून पदवी मिळवलेली असेल तर ती पदवी मिळवल्यानंतर तुम्ही किमान दोन वर्ष सलग भारतात वास्तव्य केलेले असावे.

3-सामाजिक विज्ञान तसेच कायदा, आर्किटेक्चर, ललित कला आणि संबंधित विषयातील उमेदवार असतील तर त्यांना पदवीमध्ये कमीत कमी 65 टक्के, सीजीपीए 6.8/10 किंवा जीपीए 2.6/4 ग्रेड असणे आवश्यक आहे.

4- या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे. प्रवेशाच्या पुराव्याशिवाय शिष्यवृत्ती अर्जाचा विचार केला जाणार नाही.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संबंधित उमेदवारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस सारखी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.

 पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी या ठिकाणी करावा संपर्क

तुम्हाला जर शिष्यवृत्ती योजना व पात्रतेबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही इनलॅक्स शिवदासानी शिष्यवृत्ती पोर्टल www.inlaksfoundation.org/scholarship/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

Leave a Comment