Green FD Scheme: काय आहे ग्रीन एफडी योजना? तुम्ही गुंतवणूक केली तर मिळवू शकतात मोठा नफा! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Green FD Scheme:- आपण जो काही पैसा कमावतो त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक आपण अनेक योजनांमध्ये करत असतो. जेणेकरून आपण कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करून आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी व त्यातून आपल्याला चांगला परतावा मिळावा हा प्रमुख उद्देश गुंतवणूकदारांचा असतो.

याकरिता अनेक बँकांच्या मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिट स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी तसेच एलआयसीच्या अनेक योजना व इतर गुंतवणूक पर्यायांचा वापर केला जातो. त्यासोबतच आता या पर्यायांशिवाय भारतामध्ये काही बँकांनी ग्रीन एफडी ही गुंतवणूक योजना सुरू केलेली आहे.

साधारणपणे ज्या प्रकारे मुदत ठेव योजना असतात त्या सारखीच ही योजना आहे. एवढेच नाही तर  ग्रीन एफडी गुंतवणूक योजना ही ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा 1961 अंतर्गत समाविष्ट असल्यामुळे यामध्ये गुंतवलेल्या पैशांचे सुरक्षिततेची हमी मिळते व तुमचा पैसा बुडेल याची कुठल्याही प्रकारची भीती यामध्ये राहत नाही. सध्या भारतात स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एयु बँक ही ग्रीन एफडी योजना ऑफर करत आहेत.

 ग्रीन एफडी म्हणजेच ग्रीन डिपॉझिट योजना म्हणजे काय?

सध्या जर आपण विचार केला तर भारत हरित ऊर्जा कडे वेगाने वाटचाल करत असून बँकांनी देखील भारतात सुरू असलेल्या किंवा सुरू करण्यात येतील अशा हरित प्रकल्पांना आर्थिक मदत करावी याकरिता प्रोत्साहन दिले जात आहे त्याकरताच ग्रीन एफडी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

सध्या गुंतवणुकीचे जर पर्याय पाहिले तर यामध्ये फीक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजना हा एक लोकप्रिय प्रकार आहे. परंतु जर आता भारताचा विचार केला तर भविष्याकडे वाटचाल करत असताना आपण जी काही साधने वापरतो यामध्ये विविध साधनांमध्ये हरित ऊर्जेचा वापर केला जात असून या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांच्या माध्यमातून ग्रीन एफडी योजना राबविण्यात येत आहे.

म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे या एफडी योजनेमध्ये जी काही रक्कम गुंतवली जाते ती  भारतात सुरू असलेल्या हरित ऊर्जेसंबंधी जे काही प्रकल्प आहेत त्यासाठी वापरली जाते.

या ग्रीन एफडी योजनेमध्ये जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात त्यांना त्यांच्या पैशांची सुरक्षा आणि नैतिक गुंतवणूक यांचा फायदा दिला जातो. म्हणजेच यात ज्या काही ठेवी ठेवल्या जातात त्या ठेवींचा वापर हा पर्यावरण पूरक विकास राबवणारे प्रकल्प आणि कंपन्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी केला जातो.

 स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्रीन डिपॉझिट योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एसबीआय ग्रीन रुपया मुदत ठेव योजना ऑफर केली जात असून यामध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात व गुंतवणुकीची जास्तीची कुठलीही मर्यादा नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात व यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांना 6.65% आणि ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.15% व्याजदर दिला जातो तर 2222 दिवसांची एफडी केली तर सामान्य गुंतवणूकदारांना 6.40% तर ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.40% व्याज दिले जाते.

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रीन टाईम डिपॉझिट

स्टेट बँकेसोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून देखील ग्रीन टाईम डिपॉझिट योजना ऑफर केली जात असून ही बँक 1111 दिवसांच्या ग्रीन एफडीवर 5.90% तर 2222 दिवसांच्या ग्रीन एफडीवर सहा टक्के आणि 3333 दिवसांच्या ग्रीन एफडीवर 6.10 टक्के इतकी व्याज देत आहे.

 एयु(AU) ग्रीन मुदत ठेव

AU स्मॉल फायनान्स बँकेद्वारे AU ग्रीन फिक्स डिपॉझिट एफडी ऑफर केली जात असून यामध्ये तुम्ही एक वर्ष ते दहा वर्षाच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. या बँकेच्या माध्यमातून बारा महिन्यांची ग्रीन एफडी केली तर त्यावर 6.75%, 18 महिन्यांसाठी एफडी केली तर आठ टक्के व 36 महिन्यांच्या ग्रीन एफडीवर 7.50%, साठ आणि 120 महिन्यांच्या ग्रीन एफडीवर 7.25% व्याज दिले जाणार आहे.

Leave a Comment