Badlapur To Panvel : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे राज्यात अजूनही काही रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. राजधानी मुंबईतही विविध रस्ते विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे लोकार्पण पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास जलद होणार आहे. शिवाय जेएनपीटी ते वडोदरा या मार्गाचे देखील काम सुरु आहे. दरम्यान या महामार्ग अंतर्गत एक महाकाय बोगदा तयार केला जाणार आहे.
ज्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास फक्त आणि फक्त पंधरा मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे. हा बोगदा माथेरानच्या पर्वतरांगांमधून जाणार आहे. सध्या या बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आत्तापर्यंत 25 टक्के एवढे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे हा बोगदा त्याच्या नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकेल अशी आशा आहे. या बोगद्याचे काम 2025 पर्यंत पूर्ण होईल असा दावा प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. जेएनपीटी-वडोदरा हा मार्ग बदलापूर शहरातून जातो.
दरम्यान या महामार्ग अंतर्गत माथेरानच्या डोंगरातल्या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर एवढी राहणार आहे. यामध्ये दोन मार्गिका राहणार आहेत. सध्या या बोगद्याचे दोन्ही दिशेने म्हणजेच पनवेलच्या दिशेने आणि बदलापूरच्या दिशेने देखील काम सुरू आहे.
या महामार्गामुळे पनवेल ते बदलापूर हे अंतर फक्त 15 मिनिटात पार करता येईल असा विश्वास जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे. या महामार्गामुळे बदलापूर येथील नागरिकांना बडोदा आणि जेएनपीटीला जलद गतीने पोहोचता येणार आहे.
दरम्यान या संपूर्ण महामार्गाचे काम जुलै 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे. मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे.
खरे तर सध्या स्थितीला उपलब्ध असलेल्या मार्गाने बदलापूर ते पनवेल असा प्रवास करायचा असेल तर 38 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते.
परंतु माथेरानच्या पर्वतरांगांमध्ये तयार होत असलेला हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर वळसा न घालता थेट प्रवास करता येणार असल्याने बदलापूर ते पनवेल हा प्रवास फक्त आणि फक्त पंधरा मिनिटात करता येणे शक्य होणार आहे.