देशातील ‘या’ बँका वरिष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9 टक्क्यांपर्यंतचे व्याज ! पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. विशेष म्हणजे महिला गुंतवणूकदार देखील आता एफडी करण्याला पसंती दाखवत आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये देशातील प्रमुख बँकांकडून एफडीसाठी चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे.

अलीकडेच एचडीएफसी, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने एफडीच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

दरम्यान आज आपण देशातील अशा बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जे की FD साठी जेष्ठ नागरिकांना सर्वोत्कृष्ट व्याजदर ऑफर करत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

ज्येष्ठ नागरिकांना सर्वोत्कृष्ट व्याजदर देणाऱ्या बँका

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : या स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एफडीसाठी चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेकडून 1001 दिवसांच्या एफडीसाठी जेष्ठ नागरिकांना तब्बल 9.50% एवढे व्याज दिले जात आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : ही बँक देखील एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देते. या बँकेच्या माध्यमातून 750 दिवसांच्या एफडीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.21% एवढे व्याज दिले जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : या स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून देखील एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा दिला जात आहे. या बँकेच्या माध्यमातून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या एफडी साठी 9.10 टक्के एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : ही बँक देखील एफडी करणाऱ्यांसाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते. कारण की बँकेच्या माध्यमातून एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा दिला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बँक दोन वर्ष ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी साठी 9.10% एवढे व्याज ऑफर करत आहे.

जना स्मॉल फायनान्स बँक : या बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही स्मॉल फायनान्स बँक वरिष्ठ नागरिकांना 365 दिवसांच्या एफडी साठी अर्थातच एक वर्ष कालावधीच्या एफडी साठी नऊ टक्के एवढे व्याज पुरवत आहे.

Leave a Comment