बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD Benefits : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारखे अधिक रिटर्न मिळवून देणारे विकल्प देखील गुंतवणूकदारांपुढे आहेत. याशिवाय बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना यांसारख्या सुरक्षित योजनेचा पर्याय देखील गुंतवणूकदारांपुढे आहे.

विशेष म्हणजे महिला गुंतवणूकदार आजही सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात. सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक करणे महिला गुंतवणूकदारांना विशेष आवडते. मात्र अलीकडेच एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये आता महिला गुंतवणूकदारांचा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे कल काहीसा कमी झाल्याचे आढळले आहे.

तसेच महिला गुंतवणूकदार आता बँकेच्या एफडीकडे विशेष आकृष्ट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तज्ञ लोकांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांनी एफडी वरील व्याजदर बऱ्यापैकी वाढवले असल्याने आता गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आहे.

हेच कारण आहे की आता एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. दरम्यान, आज आपण तज्ञ लोकांनी सांगितलेले एफडीचे फायदे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँकेची एफडी आहे सुरक्षित : तज्ञ लोकांनी म्हटल्याप्रमाणे बँकेची एफडी ही पूर्णपणे सुरक्षित असते. वास्तविक, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) बँक एफडीवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा प्रदान करते.  अशा परिस्थितीत, बँक एफडीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत जमा केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे, म्हणजेच बँक बुडली तरीही तुमचे एफडी मधील पाच लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक सुरक्षित राहते.

कितीही रक्कम गुंतवता येते : बँकेच्या एफडी योजनेत किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. विशेष बाब अशी की, यामध्ये कमाल गुंतवणुकीची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी रक्कम तो एफडी योजनेत गुंतवू शकतो. विशेष म्हणजे तुम्ही कितीही एफडी करू शकता. म्हणजे एकाचं बँकेत कितीही एफडी केली जाऊ शकते. किंवा मल्टिपल बँकेत एफडी केली जाऊ शकते.

इच्छित कालावधीसाठी गुंतवणूक करता येते : एफडी मध्ये सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. गुंतवणूकदाराला जेवढ्या कालावधीसाठी रक्कम गुंतवायची असेल तो तेवढ्या कालावधीसाठी त्याची रक्कम गुंतवू शकतो.

कर्ज पण मिळतं बरं : जर तुम्ही तुमचा सारा पैसा एफडी करून ठेवला असेल आणि तुम्हाला अचानक पैशाची गरज उद्भवली तर अशावेळी देखील एफडी उपयोगात येते. कारण की एफडीवर कर्ज देखील घेता येते. तुम्ही जेवढी रक्कम एफडी म्हणून ठेवलेली असेल त्यापैकी 90 ते 95 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध होते. पण एफडी वर घेतलेल्या कर्जासाठी एफडीला जेवढे व्याज बँकेकडून मिळते, त्यापेक्षा एक टक्का अधिक व्याज द्यावे लागते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याज : एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना अधिकचा परतावा मिळतो. देशातील बऱ्याचशा बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीमधील गुंतवणुकीसाठी सामान्य नागरिकांपेक्षा ५० बेसिस पॉइंट्स अधिकचे व्याजदर देतात. याशिवाय काही बँका 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ‘सुपर सीनियर सिटीझन्स’ना सामान्य नागरिकांपेक्षा 0.75% अतिरिक्त व्याज देतात. यामुळे एफडी योजना ही सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायदेशीर ठरते.

कर सूट मिळवता येते : तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ FD केल्यास, तुम्हाला 80C अंतर्गत कर सवलतीचा दावा करण्याची संधी मिळते. पण, तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी FD केल्यास तुम्हाला कर भरावा लागेल. याशिवाय, बँकेकडून मिळणारे व्याज पाच वर्षांत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, तरीही तुम्हाला कर भरावा लागणार आहे. 

Leave a Comment