Bank FD Interest Rate : बँकेत एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. खरंतर, अलीकडे एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना अलीकडे बँकेच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आहे.

एक काळ असा होता जेव्हा महिला प्रामुख्याने सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत असत. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे आता एवढी मध्ये गुंतवणूक करण्याला महिला गुंतवणूकदारांनी विशेष पसंती दाखवली आहे.

Advertisement

विशेष बाब अशी की, गेल्या काही वर्षांमध्ये बँकेच्या माध्यमातून FD मध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील दिला जात आहे. ज्येष्ठ गुंतवणूकदारांना तर बँकेच्या माध्यमातून एफडीकरिता अधिकचे व्याजदर दिले जात आहे.

दरम्यान आज आपण 3 वर्षांच्या एफडीसाठी कोणत्या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर दिले जात आहे याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

तसेच या बँकांमध्ये जर एक लाख रुपयांची एफडी केली तर तीन वर्षांनी किती रिटर्न मिळणार हे देखील आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील बारा पीएसबी पैकी एक आहे. पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे.

Advertisement

या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या FD योजना चालवल्या जात आहेत. तीन वर्षांची एफडी योजना देखील बँकेकडून सुरू करण्यात आली आहे. या एफडी योजनेसाठी बँकेकडून चांगले व्याज ऑफर केले जात आहे.

या बँकेकडून तीन वर्षांच्या एफडी साठी जेष्ठ गुंतवणूकदारांना 7.25% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. अर्थातच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या बँकेत एक लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर एक लाख 24 हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे.

Advertisement

HDFC बँक : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडूनही एफडीच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. एचडीएफसी बँकेच्या तीन वर्षाची एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळत आहे. अर्थातच या योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर त्याला मॅच्युरिटीवर एक लाख 25 हजार रुपये मिळणार आहेत.

बँक ऑफ बडोदा : या बँकेकडूनही ज्येष्ठ नागरिकांना FD साठी चांगले व्याजदर दिले जात आहे. तीन वर्षांच्या FD वर ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज ऑफर करत आहे. म्हणजे यात एखाद्या ज्येष्ठ गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर त्याला मॅच्युरिटीवर 1.26 लाख रुपये मिळणार आहेत.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *