FD वर कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Loan : गुंतवणुकीसाठी भारतात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व आहे. एफडी मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांच्या काळात देशातील अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहे. यामुळे येथील गुंतवणुकीतून आता गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळू लागला आहे.

एफडीमधून चांगला परतावा मिळतो गुंतवणूक सुरक्षित असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एफडीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी जर एखाद्याला पैशांची अडचण भासली तर एफडीवर कर्ज देखील मिळते.

दरम्यान जर तुम्हीही बँकेत एफडी केली असेल आणि एफडी वर कर्ज घेण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की आज आपण एफडीवर कर्ज घेताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमुल्य माहिती विषयी सविस्तर.

मिळालेल्या माहितीनुसार, FD वर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना एफडीमध्ये जमा केलेल्या एकूण रकमेपैकी जास्तीत जास्त 85 टक्के कर्ज म्हणून दिले जाऊ शकते.

FD वर कर्ज घेतल्यास तुम्हाला बँक एफडीसाठी जेवढे व्याज देत आहे त्यापेक्षा दीड टक्क्यांपासून ते दोन टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याजदर आकारणार आहे. म्हणजे जर तुम्हाला एफडीसाठी 6.5 टक्के एवढे व्याज मिळत असेल तर तुम्हाला जवळपास साडेआठ टक्क्यांपर्यंतचे व्याज FD वर घेतलेल्या कर्जासाठी द्यावे लागणार आहे. 

एफडी कर्ज सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते कारण ते घेत असताना बँका तुमची एफडी सुरक्षा/ हमी म्हणून गहाण ठेवत असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची गरज नसते. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नसाल, तर ते कर्ज तुमच्या FD मध्ये जमा केलेल्या रकमेमधून कापले जाणार आहे.

एफडी वर कर्ज घेतल्यास तुम्हाला प्रोसेसिंग फि लागणार नाही. तुम्हाला जेवढे कर्ज मिळेल त्यावरच फक्त व्याज आकारले जाईल.

एफडी जर 3 वर्षांसाठी केली असेल तर ते 3 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच मॅच्युरिटीच्या आधी एफडीवर घेतलेले कर्ज फेडावे लागणार आहे. तसेच पाच वर्षांच्या टॅक्स सेविंग एफडी वर लोन मिळणार नाही. याची काळजी ग्राहकांनी घ्यायची आहे. शिवाय, एफडीवर घेतलेले कर्ज मुदतपूर्व फेडायचे असेल तर तुम्हाला कोणतेच अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

Leave a Comment