बातमी कामाची ! सर्वात कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या देशातील टॉप 5 बँका कोणत्या ? पहा संपूर्ण यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Interest Rate : तुम्हीही बँकेकडून कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरे तर वाढत्या महागाईमुळे महिन्याकाठी येणाऱ्या उत्पन्नातून फक्त घराचा खर्च भागत आहे. अशा परिस्थितीत काही वैयक्तिक अन इमर्जन्सी कामांसाठी पैशांची गरज भासली तर काहीजण बँकेकडून कर्ज काढत असतात.

अचानक पैशांची गरज भासली तर वैयक्तिक कर्जाचा पर्याय सर्वात बेस्ट ठरतो. मात्र बँकेकडून वैयक्तिक कर्ज देतांना अधिकचा व्याजदर आकारला जातो. हेच कारण आहे की अनेक तज्ञ सर्वसामान्यांना खूपच गरजेचे असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्यावे असा सल्ला देतात.

जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नसेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारला पाहिजे. कारण की वैयक्तिक कर्जांवरील व्याजदर अधिक असते.

आता मात्र आपण देशातील सर्वात कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज देणाऱ्या टॉप पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हीही वैयक्तिक कर्ज अर्थातच पर्सनल लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कोणत्या बँका कमी व्याजदरात देतात कर्ज

HDFC बँक : भारतात प्रायव्हेट सेक्टर मधील बँकांची संख्या ही खूप अधिक आहे. यात एचडीएफसी बँकेचा देखील समावेश होतो. ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. विशेष म्हणजे ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखले जाते. सुरक्षित बँकांच्या यादीत या बँकेचा समावेश होतो. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज पुरवले जात आहे.

बँकेकडून चाळीस लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जाते. या कर्जासाठी बँकेकडून 10.75 टक्क्यांपासून ते 24 टक्क्यांपर्यंतचे व्याज आकारले जाते. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी तीन महिने ते 72 महिने एवढा असतो. मात्र यासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागते. या कर्जासाठी जवळपास पाच हजार रुपयांची प्रोसेसिंग फी लागते.

SBI बँक : ही देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. यातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. बँकेकडून देखील आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज दिले जात आहे. बँकेकडून 11.15% व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. एसबीआय वीस लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज ऑफर करते. वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर हे सिबिल स्कोरवर अवलंबून असते.

ICICI बँक : ही देखील प्रायव्हेट सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. ICICI बँक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते. बँकेकडून ग्राहकांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे. 10.65 टक्के ते 16 टक्के व्याज दरात बँकेकडून पर्सनल लोन मिळते. याशिवाय ग्राहकांना कर्जाच्या 2.50 टक्के एवढी रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून भरावे लागते.

कोटक महिंद्रा बँक : कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज पुरवत आहे. बँकेच्या माध्यमातून 50,000 ते  40 लाखां रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे. कोटक महिंद्रा 10.99 टक्के दराने वैयक्तिक कर्ज दिले जात आहे.

पंजाब नॅशनल बँक : एसबीआय नंतर पंजाब नॅशनल बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. म्हणजे देशातील एकूण 12 पीएसबी पैकी सार्वजनिक क्षेत्रातील ही दुसरी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक 12.75 टक्के ते 17.25 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. 

Leave a Comment