Bank FD Limit : आपल्यापैकी अनेकजण संसाराच्या गरजा भागवून उरलेला पैसा गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत असतील. गुंतवणुकीसाठी देशात वेगवेगळे पर्याय आपल्याला पाहायला मिळतात. बँकेची एफडी, आरडी, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीची बचत योजना, केंद्र शासनाच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा अनेक योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत.
मात्र या सर्वांमध्ये बँकेच्या एफडी योजनेला विशेष लोकप्रियता मिळालेली आहे. अलीकडे एफडी योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळू लागला आहे.
त्यामुळे येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जर तुम्ही देखील एफडी करण्याच्या मूडमध्ये असाल तर तुमच्यासाठी मात्र आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की, आज आपण एफडी करणाऱ्यांनी किती रक्कम गुंतवली पाहिजे तसेच एफडी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशातील काही छोट्या सहकारी बँका बंद पडल्या आहेत म्हणजेच डिफॉल्ट झाल्या आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांच्या ठेवींवर धोका वाढतो. नवीन नियमानुसार, बँक बंद पडली तर बँकेतील खातेधारकांचा एकूण ठेवींचा 5 लाख रुपयांपर्यंत विमा उतरवला जातो.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेत 15 लाख रुपयांची एफडी केली असेल आणि ती बँक दिवाळखोर ठरली तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपयेच मिळतील. म्हणजे उर्वरित 10 लाख रुपये गमावण्याचा धोका आहे.
यामुळे FD करताना या गोष्टीची देखील काळजी घेतली पाहिजे. याचा अर्थ असे नाही की तुम्ही पाच लाखांपेक्षा कमीचं FD करा परंतु तुमची रिस्क घेण्याची कपॅसिटी किती आहे आधी चेक करा, तुमच्या संसाराच्या गरजा आधी तपासा आणि त्यानंतरच एफडी करण्याचा निर्णय घ्या.
तसेच एफडी ही एका ठराविक कालावधीसाठी केली जाते. जर समजा तुम्ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी एफडी केली आहे आणि तुम्हाला मध्येच पैशांची गरज पडली आणि तुम्ही एफडी तोडण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला अशावेळी नुकसान सहन करावे लागू शकते.
म्हणजेच एफडी जर पाच वर्षांसाठी केलेली असेल तर तुम्हाला पाच वर्षानंतरच एफडी चे पैसे मिळू शकणार आहेत. मध्येच जर तुम्ही एफडी तोडली तर यासाठी तुम्हाला काही दंड भरावा लागू शकतो. याशिवाय एफडीचे पैसे ताबडतोब उपलब्ध होऊ शकत नाही.
एफडीचे पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि यानंतरच एफडीचे पैसे संबंधित गुंतवणूकदाराला मिळतात. विशेष म्हणजे एफडी मधून मिळणाऱ्या रिटर्न वर कर आकारला जातो. त्यामुळे एफडी करताना या देखील गोष्टीचे भान ठेवले पाहिजे.