देशातील सर्वात श्रीमंत गाव महाराष्ट्रात ! ‘या’ छोट्याशा खेडेगावात राहतात देशातील 60 करोडपती, तुम्हाला माहिती आहे का या गावाची ख्याती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Richest Village : पुरोगामी महाराष्ट्र अतिशय जलद गतीने विकसनशील राज्याच्या पंक्तीतून उठून विकसित राज्य बनू पहात आहे. यासाठी राज्यात मोठे राजकीय, सामाजिक अन सांस्कृतिक बदल होत आहेत. खरेतर आपले राज्य हे एक सधन राज्य आहे. राज्यात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.

यामुळे परराज्यातून आपल्या राज्यात रोजगाराच्या शोधात लाखो नागरिक स्थलांतरित होत आहे. युपी, बिहार यांसारख्या राज्यांमधून कामानिमित्त आपल्या राज्यात येणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. आपल्या राज्याची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील शहरी भागासह ग्रामीण भागाची देखील अर्थव्यवस्था तेजीने मोठी होत आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील अशा एका गावाची माहिती पाहणार आहोत जगात देशातील 60 करोडपती लोक राहतात.

हे भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. आम्ही ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते आहे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार. हे गाव संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. या गावाच्या विकासाचा मॉडेल संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अनेक लोक या गावाचा विकास पाहण्यासाठी याला भेट देतात.

खरंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लोकांना खेड्यांकडे चला असा संदेश दिला होता. अर्थातच त्यांनी खेड्यांची प्रगती झाली तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती होईल असे त्यावेळीचं म्हटले होते. मात्र स्वातंत्र्याच्या जवळपास आठ दशकानंतरही आपल्या देशात अशी अनेक खेडी आहेत ज्यामध्ये मूलभूत सोयी-सुविधा देखील नाहीयेत.

याचा अर्थ असा नाही की शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात नाहीयेत. सरकार कोणाचेही असो सर्व सरकारांनी आपल्या परीने देशाच्या ग्रामीण भागाचे चित्र पालटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, देशाचा ग्रामीण भाग जर खऱ्या अर्थाने सुदृढ बनवायचा असेल तर सध्याचे प्रयत्न हे कुचकामी ठरणारं आहेत. या प्रयत्नांना अजून अधिक बळ देण्याची गरज आहे.

यासाठी राजकारणातूनही आणि समाजकारणातूनही प्रयत्न होणे अपेक्षित आहे. एकीकडे महाराष्ट्रात काही गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे आणि दुसरीकडे हिवरे बाजार हे महाराष्ट्राच्या नकाशावर असणारे एक छोटेसे खेडेगाव जिथे 60 करोडपती वास्तव्याला आहेत. विशेष म्हणजे हे गाव आधी राज्यातील इतर खेडेगावांप्रमाणेच होते.

मात्र या गावाने आधुनिक शेतीच्या बळावर आर्थिक संपन्नता प्राप्त केली आहे. या गावात सध्या स्थितीला 60 करोडपती लोक राहत आहेत. हे गाव नगर शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या फक्त बाराशे एवढी आहे. येथील ग्रामस्थांनी लोक सहभागातून अनेक विकास कामे पूर्ण केली आहेत.

गावात पाझर तलाव केला आहे, 300 पेक्षा जास्त विहिरी खोदल्या आहेत. परिणामी गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. या गावात सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे शेतीमधून येथील शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. विशेष म्हणजे या गावातून कोणीही बाहेर रोजगारासाठी जात नाही.

गावात कोणीही बेरोजगार नाही. एकीकडे बेरोजगारीने संपूर्ण देश हैराण आहे तर दुसरीकडे हिवरेबाजार हे भारताच्या नकाशावर असलेले गाव बेरोजगारीला नष्ट करण्यास सक्षम ठरले आहे. या गावातील सरपंच पोपटराव पवार व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांतून या गावाने नेत्र दीपक अशी कामगिरी करून दाखवली आहे.

Leave a Comment